जुलै-ऑगस्ट 2022 मधील इयत्ता दहावी पुरवणी परीक्षेसाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : अमरावती दि. 1 (विमाका)- माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत पुनर्परीक्षाथी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत विषय घेवून प्रविष्ट होणाऱ्या आय टी आय (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे) Transfer of Credit घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इयत्ता दहावी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी या परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षेचे आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर नियमित शुल्कासह सादर करावयाच्या तारखांना मुतदवाढ देण्यात येत आहे. त्याचा तसेच विलंब शुल्काच्या कालावधी नियमित शुल्क 28 जून ते 30 जुन 2022, विलंब शुल्क 1 जुलै ते 4 जुलै व माध्यमिक शाळांनी बँकेत चलनाद्वारे शुल्क 5 ते 6 जुलै 2022 पर्यंत भरणे आवश्यक आहे.

    दिनांक 20 जून ते 27 जून 2022 पर्यंत नियमित शुल्काने आवेदनपत्रे सादर करावयाच्या तारखा यापूर्वी निश्चित करण्यात आलेल्या होत्या. 28 जुन ते 30 जुन 2022 पर्यंत नियमित शुल्काने व 1 जुलै ते 4 जुलै 2022 पर्यंत विलंब शुल्काने सादर करण्यास मुदत देण्यात येत आहे. असे अमरावती विभागीय मंडळाचे विभागीय सचिव उल्हास नरड यांनी कळविले आहे.