जानं राज्या आतातरी….

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
    काय राज्या पान्या
    असंई कुटी असते काय ?
    येवळाले दिवस जवाई
    सास-याच्या घरी रायते काय ?
    अखाळीले पोरीसंगं आला
    आन् ह्या गावचाच झाला
    येकाच झोपळ्यात सारेजन
    रायना-यायले कहरच केला
    जानं राज्या आतातरी
    डिकाच्या पिळ्यासरखा रुतला
    पिकं सळून रायले वावरात
    जिवाले नुस्ता घोर लावला
    बाया-मानसं,बैल-खाटे
    सारेच घरी बसून हायेत
    जरासी ऊन दिसत नाई
    घरात डोबरे साचले हायेत
    सांग कशा पेटवावं चुली ?
    डब्बे रीकामे झालेत
    काम नाई, धंदा नाई
    मिठ-मिरच्याले पैसे सरलेत
    जिकळे तिकळे नदी-नाले
    भरून वाह्यून रायले
    मानूस मानूस पानी हाये
    सारे रस्ते बंद केले
    काय कवी महाशय
    कविता लेयल्यानं पानी कुटी जाते काय ?
    पण लिह्यूनन पाह्याले
    काय हरकत हाय ?
    -अरुण विघ्ने