जर का आज लढणे थांबले…!

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
    अनादी काळापासून इथल्या
    व्यवस्थेशी आम्ही लढतो आहे
    काल आमचे पुर्वज लढले
    आज बारी आमची आहे ……
    जर का आज लढणे थांबले
    तर आमचे काही खरे नाही
    लाख पिढ्या बर्बाद झाल्या
    पुढील पिढीचेही बरे नाही …..
    आता तुमचे तुम्ही ठरवून घ्या
    नाहीतर आपली जिरवून घ्या
    काळोखावर प्रहार करून
    अशोकचक्र फिरवून घ्या …..
    प्रत्येकजण स्वार्थी झाला
    संविधानाचा लाभार्थी झाला
    तृष्णेच्या आहारी जाऊन
    शञू फौजात भर्ती झाला …..
    संविधान जगवण्यासाठी
    कुणीच रस्त्यावर येत नाही
    विकृत झाल्या व्यवस्थेला
    कुणीच शिंगावर घेत नाही …..
    अस्तित्व आणि आस्मिता
    दोन्ही आज धोक्यात आहे
    विकलांग झाल्यात भावना
    धर्मच हरेकाच्या डोक्यात आहे ….
    स्वातंत्र्य समता न्यायासाठी
    जोवर पेटून उठणार नाही
    प्रश्न आमचे वाढत जातील
    कुणीच यातून सुटणार नाही …..
    शेळी होऊन जगण्यापेक्षा
    मैदानी लढणे बरे आहे
    पण सारे एक होऊन लढलो
    तरच आमचे खरे आहे …..
    आता आपसी द्वंद नको
    माणसं माणसांशी जूळली पाहिजे
    तथागताची सम्यक वाणी
    उरी-ओठी खेळली पाहिजे …..
    -गणेश लांडगे
    ९७६४८६४२७१