- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यातल्या हरितक्रांतीचे प्रणेते मा.स्व. वसंतराव नाईक साहेबांच्या जयंतीनिमित्त 1 जुलै 2022 रोजी कृषि दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. कृषि विभागामार्फत खरीप हंगाम 2022 यशस्वी करण्याकरिता तसेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत कृषि संजिवनी मोहिम आयोजित करण्यात आली आहे. कृषि संजिवनी मोहिमेची सांगता दि. 1 जुलै 2022 रोजी कृषि दिन कार्यक्रमाने होणार आहे.
त्याअनुषंगाने पुणे येथे राज्यस्तरीय कार्यक्रम होणार असून, अन्न प्रक्रिया उद्योगातील यशस्वी महिला उद्योजिका व पौष्टीक तृणधान्य उत्पादन घेणा-या शेतक-यांना सन्मानित करण्यात येणार आहे.