• Mon. Jun 5th, 2023

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री ; देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री

    मुंबई, : श्री. एकनाथ शिंदे यांनी आज राजभवन येथे झालेल्या समारंभात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पद व गोपनीयतेची शपथ दिली.

    जवळपास दहा दिवसांच्या सत्तासंघर्षाची अखेर अवघ्या चार तासांतील नाट्यमय घडामोडींनी झाली. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील, अशी जोरदार चर्चा असताना फडणवीसांनी धक्कातंत्र वापरत शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याची घोषणा केली. त्यानंतर राजभवनातील दरबार हॉलमध्ये आज संध्याकाळी साडेसात वाजता एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली.

    “हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने मी एकनाथ संभाजी शिंदे शपथ घेतो की…” असं म्हणत शिंदेंनी गोपनीयतेची शपथ घेतली. त्यासोबतच देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथग्रहण केली. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, सुधीर मुनगंटीवार, आशीष शेलार, पंकजा मुंडे यांच्यासह वरिष्ठ भाजप नेते आणि एकनाथ शिंदे यांचे कुटुंबीय उपस्थित होत.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *