• Mon. Sep 25th, 2023

इंदोर – अमळनेर बस अपघातात 13 मृतदेह नदीतून काढण्यात आले

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

  मुंबई, : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अमळनेर आगाराची इंदोर- अमळनेर बस अपघातात 13 मृतदेह नदीतून काढण्यात आले असून यामध्ये 8 पुरूष, 4 स्त्रिया व एका बालकाचा समावेश आहे. जिल्हाधिकारी जळगाव व जळगाव जिल्हा प्रशासन यांचे स्थानिक प्रशासनाच्या मदतीने अपघातस्थळी मदत व बचाव कार्य सुरू आहे.

  एसटी महामंडळाकडून प्राप्त माहितीनुसार 1.चेतनचे वडील राम गोपाल जांगिड़, राहणार नांगल कला गोविंदगढ, जयपूर, राजस्थान,2.जगन्नाथ यांचे वडील हेमराज जोशी, वय 70 वर्ष, निवासी मल्हारगढ़ उदयपूर राजस्थान, 3. प्रकाश यांचे वडील श्रवण चौधरी वय 40 वर्षे, राहणार शारदा कॉलनी, अमळनेर, जळगाव, महाराष्ट्र, 4. निबाजी यांचे वडील आनंदा पाटील, वय 60 वर्ष राहणार पीलोदा अमळनेर, 5.कमला बाई यांचे पती नीबाजी पाटील वय 55 वर्षे राहणार सी. पिलोदा अमळनेर, जळगाव 6. चंद्रकांत यांचे वडील एकनाथ पाटील वय 45 वर्षे राहणार अमळनेर, जळगाव, (उपरोक्त 1 से 6 पर्यंतचे मृतकांची ओळख आधारकार्डद्वारे केलेली आहे, 7. श्रीमती अरवा यांचे पती मुर्तजा बोरा, वय 27 वर्षे राहणार मूर्तिजापूर, अकोला यांची नातेवाईकांद्वारे ओळख पटलेली, 8.सैफुद्दीन यांचे वडील अब्बास निवासी नूरानी नगर, इंदौर यांची नातेवाईकांद्वारे ओळख पटलेली आहे. तसेच मृतांमध्ये बसच्या चालक व वाहकाचाही समावेश आहे.

  याशिवाय अद्याप पाच मृतदेहांची ओळख पटायची बाकी आहे.अपघातग्रस्त बस नदीतून बाहेर काढण्यात आली असून, अपघातात अद्याप किती लोक असतील याची माहिती मिळालेली नाही. अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना एसटीमहामंडळाकडून दहा लाख रूपये मदत देण्यात येणार असून रूग्णालयात उपचारासाठी दाखल जखमींवर उपचारही एसटी महामंडळाकडून करण्यात येत आहेत. सदर अपघातासंदर्भात माहिती मिळवण्यासाठी एसटी महामंडळाने ०२२/२३०२३९४० हा हेल्पलाईन नंबर कार्यान्वित केला आहे. एसटी महामंडळाकडून दुपारी दीड वाजता सदर माहिती देण्यात आली आहे.

  अपघातस्थळी बचाव कार्य सुरू

  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची अमळनेर आगाराची इंदोर- अमळनेर बस क्रमांक एम एच 40 एन 9848 ही आज दि. 18 जुलै, 2022 रोजी सकाळी 07.30 वा. इंदोर येथून अमळनेरकडे मार्गस्थ झाली. सकाळी सुमारे 10.00 ते 10.15 च्या दरम्यान मध्यप्रदेशमधील खलघाट आणि ठिगरी मधील नर्मदा नदीच्या पूलावर सदर बस अपघातग्रस्त होऊन नर्मदा नदीत कोसळल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

  घटनास्थळी खरगोन व धारचे जिल्हा प्रशासन पोहोचले असून बस क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात येत आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत अद्ययावत माहिती घेण्याचे काम सुरु आहे. आवश्यक ती सर्व मदत करण्याच्या हेतूने जिल्हाधिकारी जळगाव व जळगाव जिल्हा प्रशासन हे खरगोन व धार जिल्हा प्रशासनाच्या नियमित संपर्कात असून अपघातग्रस्त व्यक्तींना सर्व आवश्यक ते सहकार्य करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. हेल्पलाईन क्रमांक घटनास्थळी मदतीसाठी 09555899091, जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्ष 0257- 2223180, 0257- 2217193 हे क्रमांक जिल्हाधिकारी जळगाव यांनी प्रसिद्ध केले आहेत, अशी माहिती मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून दुपारी दोनच्या सुमारास मिळाली आहे.

  (छाया : संग्रहित)

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,