• Sun. Jun 4th, 2023

आरोग्‍य यंत्रणा बळकटी करणासाठी आरोग्‍य विभागाने योग्‍य नियोजन करावे मनपा आयुक्‍त डॉ.प्रविण आष्‍टीकर

    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : सार्वजनिक आरोग्‍य विभाग व आरोग्‍य यंत्रणा यांचा कामाचा वाढता व्‍याप लक्षात घेता अमरावीतचे महानगरपालिका डॉ.प्रविण आष्‍टीकर यांनी आरोग्‍य यंत्रणेचे बळकटीकरण करण्‍यासाठी वैद्यकीय आरोग्‍य अधिकारी डॉ.विशाल काळे यांना आदेशित केलेले आहे. अतिरिक्‍त आयुक्‍त हर्षल गायकवाड यांच्‍या मार्गदर्शनाखाली आरोग्‍य यंत्रणा अधिक सक्षमपणे कार्य करण्‍यासाठी सज्‍ज होत आहे.

    कोरोनाच्‍या पहिल्‍या दुस-या आणि तिस-या लाटेत आरोग्‍य सुविधांसाठी सर्वसामान्‍य जनतेची निकड वाढलेली होती तसेच नियमित दिल्‍या जाणा-या सोयी सुविधांचे पुन:रुज्‍जीवन करणे ही आवश्‍यक होती. महानगरपालिका आयुक्‍त डॉ.प्रविण आष्‍टीकर यांनी पदभार सांभाळताच कोरोनाचे संकट येवून घातले होते त्‍यामुळे आरोग्‍य विभागाचा प्रथम प्राधान्‍याने आढावा घेण्‍यात आला व त्‍यातील त्रुटी व निकड लक्षात घेता सुविधांचे बळकटीकरण करण्‍याकरिता नियोजन व अंमलबजावणी करण्‍यात आली.

    कोरोनाच्‍या तिस-या लाटेचे नियोजन – कार्यभार घेतल्‍यावर लगेच कोरोनाच्‍या तिस-या लाटेचे आगमन झाले व त्‍याचे सुयोग्‍य नियोजन महानगरपालिके मार्फत करण्‍यात आले. याप्रसंगी व्‍ही.एम.व्‍ही. येथे कोरोना केअर सेंटर स्‍थापन करणे, कोरोना वार रुम, होम आयसोलेशन कॉल सेंटर, स्‍वाब कलेक्‍शन सेंटर, कंटेनमेंट झोन, सानुग्रह अनुदान, शीघ्र प्रतिसाद चमू इत्‍यादी विविध सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यात आल्‍या. कोरोना लसीकरणासाठी लोकांपर्यंत पोहोचण्‍यासाठी “हर घर दस्‍तक” सारख्‍या मोहीम राबविण्‍यात आल्‍या व लसीकरणाच्‍या चमू वाढविण्‍यात आले. कोरोनासाठी खाजगी दवाखान्‍यात बेडची उपलब्‍धता करुन देण्‍यात आली तसेच तारखेडा येथे कोविड केअर सेंटर साठी बेडची तयारी ठेवण्‍यात आली.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *