• Fri. Jun 9th, 2023

अमरावती विभागात सर्वदूर पाऊस जूनपासून आतापर्यंत 402.7 मिमि पावसाची नोंद

  * चोवीस तासांत यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक सरासरी 60.6 मिमि पाऊस
  गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

  अमरावती (प्रतिनिधी) : अमरावती विभागात आज 56 तालुक्यात पाऊस झाला. प्राप्त अहवाला नुसार, दुपारी बारावाजेपर्यंत झालेल्या पावसाच्या घेण्यात आलेल्या नोंदी नुसार विभागात 1 जून ते आजपर्यंत 402.7 मि मि पावसाची नोंद करण्यात आली आहे. मागील 24 तासांत विभागात यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक सरासरी 60.6मिली मिटर पाऊस झाला.

  विभागात नोंदला गेलेला आजचा तालुका निहाय पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी यंदा 1 जूनपासून आजवर झालेल्या पावसाची आहे. सर्व आकडेवारी मिली मिटर परिमाणात आहेत.

  अमरावती जिल्हा : धारणी 82.2 (407.5), चिखलदरा 83.4 (534.3),अमरावती 63.3 (335.5), भातकूली40.0 (260.0), नांदगावखडेश्वर69.3 (406.5), चांदूररेल्वे70.2 (368.2), तिवसा45.4 (513.4), मोर्शी61.6 (401.3), वरुड25.7 (396.0), दर्यापूर30.3 (259.7), अंजनगाव43.2 (295.6), अचलपूर 49.1 (271.8), चांदूरबाजार 78.3 (425.4), धामणगाव रेल्वे 75.8(485.1)अमरावती जिल्ह्यात चोवीस तासात सरासरी 57.5मि.मिपाऊसझाला. जिल्ह्यात यंदा आजवर सरासरी376.1मि.मि. पाऊस झाला.

  अकोला जिल्हा :- अकोट7.8 (196.0), तेल्हारा44.4 बाळापूर 60.7 (422.7), पातूर51.4 (337.4), अकोला37.6 (382.0), बार्शीटाकळी 29.0 (279.5), मुर्तीजापूर 28.9 (274.4), जिल्ह्यात 24 तासात सरासरी 35.9 मि.मितर आजवर 315.8 मि.मि पाऊस झालाआहे.

  यवतमाळ जिल्हा : यवतमाळ 70.1 (478.0), बाभूळगाव 103.4(466.1),कळंब 130.6 (516.4), दारव्हा 39.1 (358.8), दिग्रस 35.3 (438.2), आर्णी 38.8 (527.3), नेर 103.1 (430.2), पुसद 27.3 (383.7), उमरखेड 37.7 (491.3), महागाव 48.3 (575.3), वणी 41.2 (712.5),मारेगाव 42.0 (661.2), झरीजामणी 37.9 (602.8), केळापूर 42.4 (598.8), घाटंजी 47.6 (503.0), राळेगाव 147.9 (685.1), जिल्ह्यात 24 तासात सरासरी 60.6 तर यंदाच्या हंगामात आजवर सरासरी 525.2मि.मि पाऊस झाला आहे.

  बुलडाणा जिल्हा :- जळगाव जामोद 58.3 (231.8), संग्रामपूर 76.0 (281.6), चिखली 30.5 (365.3), बुलडाणा 32.7 (461.6), देऊळगाव राजा 13.1 (345.2), मेहकर 34.3 (394.9), सिंदखेडराजा 17.4 (398.3), लोणार 19.3 (332.4), खामगाव 47.3 (286.8), शेगाव 65.7 (362.4), मलकापूर 19.0 (233.8), मोताळा 22.4 (278.1), नांदूरा33.5 (268.2), जिल्ह्यात दिवसभरात 35.4तर यंदाच्या हंगामात आजवर 333.1 मि.मि. पाऊस झाला.

  वाशिम जिल्हा : – वाशिम 39.9 (397.4), रिसोड 28.5 (429.3), मालेगाव 41.6 (417.4), मंगरुळपिर 35.9 (410.4), मानोरा 38.1 (445.7), कारंजा 42.0 (289.3), जिल्ह्यात 24 तासात 37.7 तर 1 जूनपासून आजवर 396.0 मि.मि. पाऊस झाला.

  (Images Credit : Loksatta)

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *