• Wed. Jun 7th, 2023

अमरावती विभागात सरासरीच्या तुलनेत 96.6 टक्के पाऊस

    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात अद्यापपर्यंत सरासरी 202.3 मिमि पाऊस झाला असुन विभागाच्या एकुण वार्षिक सरासरीच्या तुलनेत त्याचे प्रमाण 96.6 टक्के आहे.याबाबत विभागीय यंत्रणेकडील दिनांक 8 जुलैच्या अहवालानुसार, बुलडाणा जिल्ह्यात 193.6 मिमि, अकोला जिल्ह्यात 195.1, वाशिम जिल्ह्यात 198.7, अमरावती जिल्ह्यात 200.6 व यवतमाळ जिल्ह्यात 215.9 मिमि प्रत्यक्ष पाऊस झाला आहे.

    गतवर्षी दिनांक 8 जुलै पर्यंत बुलडाणा जिल्ह्यात 185.7, अकोला जिल्ह्यात 98.6, वाशिम जिल्ह्यात 250.2, अमरावती जिल्ह्यात 219.4 व यवतमाळ जिल्ह्यात 306.9 मिमि प्रत्यक्ष पाऊस झाल्याची नोंद आहे. हे प्रमाण एकुण सरासरीच्या 106.8 टक्के होते.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *