• Sat. Jun 3rd, 2023

अमरावती जिल्ह्यातील रोजगार इच्छुक उमेदवांराकरीता 102 रिक्तपदांवर रोजगाराची सुवर्ण संधी

    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : राज्यातील नामांकीत नियोक्तांकडून प्राप्त मनुष्यबळ मागणीनुसार जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अमरावती या कार्यालयाने पंडीत दिनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा दिनांक २०जुलै ते ३० जुलै 2022 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने www.rojgar.mahaswayam.gov.in या पोर्टलवर आयोजीत करण्यात आलेला आहे. ऑनलाईन रोजगार मेळाव्यात अमरावती जिल्ह्यासह राज्यातील नामांकित कंपन्या/आस्थापनांमध्ये 102 रिक्त जागेवर रोजगार मिळविण्याची संधी जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांना याव्दारे प्राप्त होणार आहे.

    मेळाव्यामध्ये केवल ऑनलाईन पध्दतीने सहभाग नोंदविणाऱ्या (अप्लाय) उमेदवारांनाच नोकरीची संधी प्राप्त होणार आहे. तसेच मेळाव्यात दहावी/बारावी/ पदवी/ आय.टी.आय./इंजीनिअर व इतर अर्हता धारक उमेदवारांसाठी असल्यामुळे अमरावती जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांना आवाहन करण्यात येते की, या संधीचा लाभ घेण्यासाठी त्वरीत कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग (सेवायोजन कार्यालयाच्या) www.rojgar.mahaswayam.gov.in या पोर्टलवरून आपल्या युझर आयडी व पासवर्डच्या आधारे लॉगीन करुन आपल्या शैक्षणीक पात्रतेनूसार उपलब्ध असलेल्या रिक्तपदासाठी आपला सहभाग ऑनलाईन पध्दतीने नोंदवावा. पसंतीक्रम नोंदवितांना शक्यतो आपण वास्तव्यास असलेल्या ठिकाणच्या आसपासच्या कंपन्यांची तसेच आवश्यक पात्रता धारण करीत असल्याची खात्री करुन पदाची निवड करण्याची दक्षता घ्यावी.

    इच्छुक व ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणाऱ्या उमेदवारांना त्याच्या पसंतीक्रमानुसार व उद्योजकांच्या सोईनूसार त्यांच्या मुलाखतीचे ठिकाण, दिनांक व वेळ एसएमएस अलर्ट व्दारे कळविण्यात येईल व शक्य असेल तिथे ऑनलाईन किंवा ऑफलाईन मुलाखतीचे आयोजन करण्यात येईल. तरी इच्छुक युवक- युवतींनी दि. २० जुलै ते ३० जुलै 2022 पर्यंत वेबपोर्टलव्दारे www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेत स्थळावर जावून नोकरी साधक ( नोकरी शोधा ) या ऑप्शनवर क्लिक करावे. जॉबसिकर हा पर्याय निवडून आपल्या युझरआयडीने साईन ईन व्हावे. त्यांनतर डाव्या बाजुकडील पंडीत दिनदयाळ उपाध्याय जॉब फेअर वर Click करावे. तेथे आपणास अमरावती जिल्हा निवडून त्यातील पंडीत दिनदयाळ उपाध्याय ऑनलाईन जॉब फेअर 2 हा पर्याय निवडावा त्यानंतर नमुद पात्रतेनुसार अप्लाय बटणावर क्लिक करावे. याबाबत काही अडचण असल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अमरावती या कार्यालयाचा दूरध्वनी क्रं.: (0721) – 2566066 किंवा Email amravatirojgar@gmail.com वर संपर्क करावा. ऑनलाईन मेळाव्यामध्ये जिल्ह्यातील युवक – युवतींना मोठया प्रमाणात ऑनलाईन पध्दतीने सहभाग नोंदवावा व नोकरीची संधी प्राप्त करावी. असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रफुल्ल शेळके अमरावती यांनी केले आहे.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *