• Tue. Jun 6th, 2023

अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्य महा रक्तदान शिबीर

    * राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अमरावती शहर व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आयोजन
    * रक्तदात्यांनी उपस्थित राहण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा विधिमंडळ समन्वयक संजय खोडके यांचे आवाहन
    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : महाविकास आघाडीचे नेते, महाराष्ट्राचे लाडके लोकनेता, माजी उपमुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्ष नेता अजितदादा पवार यांच्या २२ जुलै या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अमरावती शहर व राष्ट्रवादी युवक काँग्रेस वतीने महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक शेगांव नाका स्थित अभियंता भवन येथे सकाळी ८.३० वाजता पासून महारक्तदान शिबीर संपन्न होणार आहे.

    दोन वर्षाच्या कोरोना काळात महाराष्ट्राची विस्कटलेली स्थिती पूर्वपदावर आणून लोकनेते अजितदादा पवार यांनी महाराष्ट्राला विकासाची नवी दिशा देण्याचे काम केले. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात अजितदादांनी घेतलेल्या धोरणात्मक निर्णयांमुळे आज महाराष्ट्र कृषी, सिंचन, उदयॊग, आरोग्य, शिक्षण तसेच महिला विकास आदी क्षेत्रात अग्रेसर आहे. मात्र अजूनही कोरोनाचा धोका संपलेला नसून सद्याच्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रात अतोनात नुकसान झाले आहे. या सर्व आव्हानांचा धैर्याने सामना करीत व समस्त जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेले माननीय अजितदादा पवार यांनी आपला २२ जुलै रोजीच्या वाढदिवसानिमित्य कोणत्याही प्रकारचे जाहीर कार्यक्रम न घेता रक्तदाना सारखे समाजउपयोगी उपक्रम राबविण्याचे आवाहन कार्यकर्ते व हितचिंतकांना केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, प्रवक्ता तथा विधीमंडळ समन्वयक संजय खोडके यांच्या मार्गदर्शनात शुक्रवार दिनांक २२ जुलै २०२२ रोजी स्थानिक अभियंता भवन शेगांव नाका अमरावती येथे सकाळी ८.३० वाजतापासून महारक्तदान शिबीर संपन्न होणार आहे.

    पुरोगामी महाराष्ट्र राज्याच्या सर्वांगीय विकासाची यशस्वी घोडदौड अशीच सुरू राहण्यासाठी महाराष्ट्राचे लाडके लोकनेते माननीय अजितदादा पवार यांना सुदृढ आरोग्य लाभो, दीर्घायुष्य लाभो, अशी मनोकामना करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अमरावती शहर व राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तसेच रक्तदात्यांनी या विधायक उपक्रमात आवर्जून सहभाग दर्शवून अमरावतीच्या रक्तदान चळवळीला अधिक गतिमान करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष ,प्रवक्ता तथा विधीमंडळ समन्वयक संजय खोडके यांनी केले आहे.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *