- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : इयत्ता दहावी व बारावीची जुलै-ऑगस्ट 2022 दि. 11 जुलै ते 12 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये परीक्षा आयोजीत केलेली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेसंबंधी समस्याचे निराकरण/मार्गदर्शन करण्यासाठी सकाळी 8 ते सायंकाळी 8 या वेळेत पुर्णवेळ कार्यान्वीत राहील. अमरावती विभागातील जिल्हानिहाय चार समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यार्थी तसेच पालकांनी समुपदेशन सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन विभागीय सचिव उल्हास नरड यांनी केले आहे.
अकोला व वाशिम जिल्ह्यासाठी एन. आर. गोडचर (9922063636) पं. नेहरु हायस्कुल, वरुर ता. अकोट, अकोला. अमरावतीसाठी सी. एम. गुलवाडे (8007042402) जनता हायस्कुल हरम ता. अचलपूर, बुलढाणासाठी एस. एन. लाघे (9552290889) सी. एस. कोठारी हायस्कुल, नांदुरा. यवतमाळसाठी एस. एम. राजगुरे (9527450385) बाबाराव खोडे विद्यालय, वडगांव ता. दारव्हा यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन अमरावती विभागीय मंडळाचे विभागीय सचिव उल्हास नरड यांनी केले आहे.