Header Ads Widget

डॉक्टरकीच्या स्वप्नातील विद्यार्थ्यांचे पाऊल आयुर्वेद व होमिओपॅथीकडे...

  * आता आयुर्वेदालाच प्रचंड मागणी

  राज्यातील विद्यार्थ्यांना आयुर्वेदाची भुरळ पडली आहे. एमबीबीएस नंतर आयुर्वेदालाच विद्यार्थ्यांची पसंती, तर होमिओपॅथीकडेही कल वाढत चालला आहे. आतापर्यंत एमबीबीएस नंतर होमिओपॅथीला प्रचंड मागणी होती. मात्र, आता याची जागा आयुर्वेदाने घेतली आहे. बारावीनंतर निट युजी परीक्षा देऊन मेडिकल क्षेत्रात डॉक्टर होण्याचं स्वप्नं अनेकांचं असतं. म्हणून देशभरातील लाखो विद्यार्थी निट ची तयारी करत असतात. मात्र सर्वांनाच एमबीबीएस ला प्रवेश मिळू शकत नाही. म्हणून काही विद्यार्थी आयुर्वेदिक, होमिओपॅथी किंवा डेंटल क्षेत्रात डॉक्टर होतात. आतापर्यंत एमबीबीएस नंतर होमिओपॅथीला प्रचंड मागणी होती मात्र आता याची जागा आयुर्वेदाने घेतली आहे. टाइम्स ऑफ इंडियानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार ही माहिती समोर आली आहे.

  गेल्या काही वर्षांमध्ये आयुर्वेद क्षेत्रामध्ये येणा-या कंपन्या आणि या क्षेत्राला वाढणारी मागणी बघता विद्यार्थ्यांचा कल याकडे आहे. गेल्या काही वर्षांमध्ये देशातील लोकही वेस्टर्न आणि परदेशातील औषध घेण्यापेक्षा आयुर्वेदिक उपचारांवर अधिक भर देत आहेत म्हणून विद्यार्थ्यांना या क्षेत्रांमध्ये रस वाटू लागला आहे.

  शिवाय विद्यार्थ्यांना आधुनिक वैद्यक शास्त्राचा अभ्यास करता करता आयुर्वेदाचाही अभ्यास करता येत असल्याने त्यांचा कल आयुर्वेदाकडे वाढला. त्याचबरोबर यात विद्यार्थ्यांना दुस-या वर्षापासूनच क्लिनिकल एक्सपोजर देखील मिळते. कोविड-19 महामारीच्या काळात आयुष डॉक्टरही आघाडीवर होते. आयुर्वेदिक डॉक्टर ग्रामीण आरोग्य केंद्रांमध्ये नोकरी करू शकतात, जिथे डॉक्टरांची कमतरता आहे. टॉई च्या अहवालानुसार महाराष्ट्रातील निट युजी च्या विद्यार्थ्यांचे मागील वर्षांचे पुढील आकडे बघून आयुर्वेदाला मागणी वाढल्याचं दिसून आलं आहे. गेल्या चार वर्षांत महाराष्ट्रात आयुर्वेदाच्या जागांमध्ये ३० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. यापैकी केवळ काही जागा दरवर्षी रिक्त राहतात.

  आयुर्वेदाबरोबरच होमिओपॅथीही विद्यार्थ्यांना आवडू लागली आहे. तेही याला खूप पसंती देत ​​आहेत आणि २०१९-२० मध्ये जिथे ८४४ जागा रिक्त होत्या, तिथे आता ही संख्या ६० वर पोहोचली आहे. २०१८-१९ मध्ये महाराष्ट्र राज्यात आयुर्वेदाच्या ४३०० जागा होत्या, २०२१-२२ मध्ये त्या सुमारे ५६०० पर्यंत वाढल्या. कोरोनानंतर आयुर्वेद आणि होमिओपॅथीकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. जीवनशैलीतील अनेक आजारांवर आधुनिक वैद्यकशास्त्र तितकेसे प्रभावी नसले तरी या दोन्ही शाखांनी उत्तम काम केले आहे.

   आयुर्वेद आणि होमिओपॅथीमधील पीजी अभ्यासक्रमांचीही हीच स्थिती आहे. जिथे विद्यार्थी संख्या आणि जागा वाढल्या आहेत. २०१९-२० मध्ये आयुर्वेद पीजीच्या एकूण जागा १०९२ होत्या, त्या पुढील वर्षी ११६३ पर्यंत वाढल्या. २०१९ मध्ये ३५५ जागा रिक्त होत्या, त्यानंतर २०२० मध्ये ही संख्या फक्त १२६ राहिली.

    शब्दस्पर्शी-सुनील शिरपुरे
    कमळवेल्ली,यवतमाळ
    भ्रमणध्वनी-७०५७१८५४७९

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या