Featured Post

Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

‘दिलखुलास’ कार्यक्रमात सिद्धार्थ खरात यांची मुलाखत

    मुंबई, : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात सामाजिक न्याय दिनाच्या निमित्ताने राजर्षि शाहू महाराज यांच्या विचारांचे अभ्यासक सिद्धार्थ खरात यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर शनिवार दि.25 जून व सोमवार 27 जून 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. रेश्मा बोडके यांनी ही मुलाखत घेतली आहे.

    महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीला दिशा देणारे, समाजाच्या सर्वात शेवटच्या घटकांपर्यंत शिक्षण पोहोचावे यासाठी काळजी करणारे, आधुनिक जगाशी नाळ जोडताना रयतेच्या कल्याणाचा विचार करणाऱ्या राजर्षि शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी केली जाते. यानिमित्ताने राजर्षि शाहू महाराजांचे लोकोत्तर कार्य, त्यांचा दूरदृष्टीपणा, समाजातील तळागाळातील लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि एकूणच महाराष्ट्राच्या जडण-घडणीतील त्यांचे योगदान याविषयी सविस्तर माहिती सिद्धार्थ खरात यांनी दिलखुलास या कार्यक्रमातून दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code