Header Ads Widget

वन तस्करी रोखण्यासाठी अशोक कविटकर यांचे पुस्तक मार्गदर्शक ठरेल - कायदेतज्ज्ञ अॅड. उज्वल निकम

    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : निवृत्त वनाधिकारी अशोक कविटकर यांनी गत 30 वर्षांपासून वन कायद्यातील तरतुदींचा अभ्यास करून "वन अधिकाऱ्यांसाठी नित्योपयोगी कायद्याचे आकलन - सोप्या स्वरुपात" हे पुस्तक मराठीत लिहिले आहे. हे पुस्तक वनतस्करीला प्रतिबंध, कायद्याचे काटेकोर पालन या बाबींसाठी मार्गदर्शक ठरेल, असे मत ज्येष्ठ विधीज्ञ पद्मश्री ॲड. उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले.

    लेखक श्री. कविटकर यांनी नुकतीच ॲड. निकम यांची भेट घेऊन पुस्तक भेट दिले, त्यावेळी पुस्तकाचे अवलोकन करताना ते बोलत होते. वनाधिकाऱ्यांना या पुस्तकाद्वारे विविध कायद्यात असलेल्या तरतुदीची सुलभ भाषेत माहिती मिळेल व कायद्याचे सखोल ज्ञान प्राप्त होऊन आपल्या कामात भरीव मदत होईल, अशी प्रतिक्रिया ॲड. निकम यांनी व्यक्त केली.

    संघटितपणे अवैध वृक्षतोड, वन्य प्राण्यांची होत असलेली शिकार अशा घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी तस्करांविरुध्द कठोर कारवाई करणे आवश्यक असते. त्यासाठी वनाधिकाऱ्यांना कायद्याचे सखोल ज्ञान असणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने आवश्यक माहिती मिळण्यासाठी पुस्तक उपयुक्त ठरेल, असेही त्यांनी सांगितले. श्री. कविटकर यांनी गत आपला अनुभव, तसेच तीस वर्षांपासून वेगवेगळ्या तज्ज्ञांकडून प्राप्त ज्ञान याआधारे पुस्तक लिहिले आहे. वनतस्करी रोखण्यासाठी अनेक यशस्वी कारवायाही त्यांनी केल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या