Header Ads Widget

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सेवा सुरु

    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : दहावीच्या निकालानंतर काही विद्यार्थी नकारात्मक विचाराने मानसिक दडपणाखाली येण्याची शक्यता असते. त्यामुळे शिक्षण मंडळ स्तरावरुन अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी ऑनलाईन समुपदेशन सेवा सुरु ठेवण्यात येत आहे. सदर समुपदेशकांचे भ्रमणध्वनी क्रमांक खालीलप्रमाणे आहेत.

    त्यानुसार 8432592358, 7249005260, 7387400970, 9307567330, 7822094261, 9579159106, 9923042268, 7498119156, 8956966152 हे भ्रमणध्वनी क्रमांक दिलेले समुपदेशक परीक्षेच्या निकालाच्या दिवसापासून 8 दिवस सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत विद्यार्थ्यांना भ्रमणध्वनीद्वारे निशुल्क आवश्यक ते समुपदेशन करतील याची विद्यार्थी, पालक यांनी नोंद घ्यावी, असे कळविण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या