Header Ads Widget

हृदयविकारामागील कारणे

    जाडी असेल तर शरीर अनेक रोगांचं घर बनू शकतं असा समज असतो. हे सत्यही आहे. पण याचा अर्थ शरीरयष्टी सडपातळ असेल तर आजार आजूबाजूला फिरकत नाहीत असा होत नाही. चुकीच्या जीवनशैलीमुळे सडसडीत लोकांनाही हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. त्यामुळे नियमित आरोग्य तपासणी, व्यायाम आणि संतुलित आहार याला पर्याय नाही हे सदैव ध्यानी ठेवा. हृदयविकाराचा झटका येण्यामागील कारणं जाणून घेऊ या.

    उच्च रक्तदाबाच्या रूग्णांच्या शरीरातलं कोलेस्टेरॉल वाढतं. यामुळे रक्ताच्या गुठळ्या होऊन हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. स्थूल लोकांना मधुमेह, उच्च रक्तदाब तसंच कोलेस्टेरॉल यासारख्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. धूम्रपान करणार्‍यांना हृदयविकाराचा धोका असतो. वाढत्या वयात आरोग्याकडे लक्ष न दिल्याने कोलेस्टेरॉल वाढून हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. मधुमेहाच्या रूग्णांमध्ये ब्लॉकेजची समस्या निर्माण होऊन हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. कोलेस्टेरॉलचं प्रमाण जास्त असेल तर रक्ताभिसरणात अडथळे येतात आणि हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. अनुवंशिकतेमुळेही हृदयविकार जडू शकतो. अधिक प्रमाणात चरबीयुक्त आहार घेणार्‍यांना हृदयविकार जडू शकतो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या