Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

डोळे उघडले पाहिजे...

    रोज आतंक माजतो
    होतो खून खराबा
    आपल्याच बघना देशाची
    खिल्ली उडते भावा
    काय शिकेल उद्याचा
    तो विद्यार्थी नवा
    गुन्हे गारी पाहून आपल्याच देशातली
    काय विचार करेल भावा
    शाळेतून येताना
    जेव्हा भट्टी त्याला दिसते
    अन् दरुड्याच्या रुपात
    प्रत्यक्ष त्याचाच बाप असते
    काय परिणाम होत असेल
    त्या चिमुकल्याच्या मनावर
    उद्याचे भविष्य आपल्या ते देशाचे
    काय बर म्हणून लढेल आपल्या देश्यावरच्या सीमेवर
    देशावर प्रेम करा
    असे म्हणणे जरी सोपे असले
    पण त्याला त्याच्या मनावर ही बिंबवले पाहिजे
    देशाने ही नागरिकांवर तेवढेच प्रेम केले पाहिजे
    त्यासाठी भारत सरकारने
    दारूबंदी केलीच पाहिजे
    उध्वस्त होणाऱ्या त्या पिढीला
    व्यसनाधीन होण्यापासून वाचविलेच पाहिजे
    शिक्षणानेचं विद्यार्थी हा
    नेहमीच घडत असते
    पण या घडणाऱ्या विद्यार्थ्याला देखील
    ती सरकारच बिघडवत असते
    शिकून शिकून बिचारा
    अर्धा म्हाताराही होतो
    बेरोजगारी पायी एक दिवस
    तो आत्महत्या करतो
    जाहिराती तर मोठं मोठ्या
    अश्याच फेकल्या जातात
    अरे डोळे आमचे उघडण्या पेक्षा
    त्या आमच्या सरकारचेच उघडले पाहिजे
    केलीच पाहिजे दारू बंदी
    लढलो पाहिजे उद्यासाठी
    सरकारसाठी आपण नाही
    आपल्या साठी सरकार पाहिजे
    प्रतिक्षा गजानन मांडवकर
    (स्वप्न डोळ्यातले)
    8308684865
    यवतमाळ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code