Featured Post

Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

महानगरपालिका आयुक्‍त डॉ.प्रवीण आष्‍टीकर यांनी केली भिमटेकडी ची पाहणी

  गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

  अमरावती (प्रतिनिधी) : महानगरपालिका आयुक्‍त डॉ.प्रवीण आष्‍टीकर यांनी बुधवार दिनांक १ जुन,२०२२ रोजी भिमटेकडी परिसराची पाहणी केली. भिमटेकडी येथे महानगरपालिकेतर्फे अनेक कामे करण्‍यात आली आहे. ध्‍यान केंद्र, प्रसाधन गृह, पिण्‍याच्‍या पाण्‍याची व्‍यवस्‍था, पर्यटन निवास, स्‍वागत कक्ष तसेच भिमटेकडी येथे वृक्षारोपण करण्‍यात आले असून त्‍याची आताची स्थिती काय आहे याची यावेळी पाहणी करण्‍यात आली.

  भिमटेकडी निर्माण झाल्‍यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत आहे. या टेकडीचा विकास व्‍हावा अशी इच्‍छा परिसरातील नागरीकांनी यावेळी व्‍यक्‍त केली. प्रकाश व्‍यवस्‍था, झाडांची कटाई, पाणी व्‍यवस्‍था व इतरही राहलेल्‍या कामांची माहिती यावेळी नागरीकांनी दिली. सदर काम मार्गी लावण्‍याच्‍या सुचना यावेळी आयुक्‍त महोदयांनी दिल्‍या. अमरावती महानगरपालिका तसेच शासनाच्‍या निधीतुन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकास केलेला आहे.

  भिमटेकडी सौंदर्यीकरणाचे काम पुर्णत्‍वास आले आहे. असंख्‍य नागरिक या टेकडीवर शुध्‍द हवा मिळावी या हेतुने फिरण्‍यासाठी येतात. टेकडीच्‍या सौंदर्यीकरण आणि देखभाल करण्याची जबाबदारी महानगरपालिकेची आहे. महानगरपालिका आयुक्‍त डॉ.प्रवीण आष्‍टीकर यांनी सदर कामाचे कौतुक केले व या संदर्भात कोणत्‍याही प्रकारचे सहकार्य लागल्‍यास पुढाकार घेतला जाईल. भिमटेकडीचे सौंदर्य दिवसेंदिवस वाढतच आहे. येथे आल्‍यावर मनाला वेगळाच आनंद होतो. या टेकडीचे सौंदर्य आपण सगळे‍ मिळून टिकवू या असे आयुक्‍तांनी आपले मनोगत व्‍यक्‍त केले.

  अमरावती महानगरपालिका क्षेत्रामध्‍ये पर्यटन स्‍थळ म्‍हणून प्रामुख्‍याने भिमटेकडी चा समावेश आहे. या टेकडीवर सुध्‍दा मॉर्निंग वॉकला व पर्यटन स्‍थळ म्‍हणून रोज हजारो पर्यटक या ठिकाणी येतात. या ठिकाणी खालच्‍या भागात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा मोठा पुतळा असून भिक्षुंचे निवासस्‍थान आहे. तसेच वरच्‍या भागात पर्यटन मंत्रालयाकडुन प्राप्‍त निधीतून महानगरपालिका कडुन मोठ्या स्‍तुपचे विहाराचे बांधकाम झालेले आहे. परिसरामध्‍ये देखरेख व कुठल्‍याही प्रकारची अनुचित घटना घडु नये याकरीता सुरक्षा रक्षकांची अत्‍यंत आवश्‍यकता आहे. या संदर्भात हजारो नागरिकांची सुरक्षा रक्षकांची मागणी होत आहे. करीता भिमटेकडी या पर्यटन स्‍थळी २ सुरक्षा रक्षकांची तातडीने नियुक्‍ती करण्‍यात यावी अशी मागणी केली. उर्वरीत सुरक्षा भिंतीचे बांधकाम करण्‍याच्‍या सुचना यावेळी त्‍यांनी दिल्‍या.

  सदर पाहणी बौध्‍द धम्‍म प्रचार समितीचे अध्‍यक्ष आयु.घनश्‍याम आकोडे, उपाध्‍यक्ष आयु.भारत शहारे, सरचिटणीस आयु.आनंद तायडे, सहचिटणीस आयु.प्रा.जयंत बनसोड, को‍षाध्‍यक्ष प्रसन्‍न गायकवाड, तांत्रिक सल्‍लागार जिवन सदार, सहाय्यक आयुक्‍त नंदकिशोर तिखिले, उपअभियंता भास्‍कर तिरपुडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता, आयु.सुमित्राबाई भोगे, आयु.पांडुरंग जामनिक, आयु.किशोर तायडे, आयु.उत्‍तमराव शिंगणापुरे, आयु.प्रा.भगवान गोसावी, आयु.अॅड.पुरुषोत्‍तम खडसे, आयु.इंजि. गोपाल इंगळे, कंत्राटदार व परिसरातील नागरीक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code