Header Ads Widget

विधानसभेचे विशेष अधिवेशन ३० जूनला सर्व सदस्यांना सूचना जारी

    मुंबई : महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन उद्या गुरूवार, दिनांक ३० जून, २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता विधान भवन, मुंबई येथे अभिनिमंत्रित करण्यात आले आहे.

    सर्व विधानसभा सदस्यांना यासंदर्भात विधानमंडळ सचिवालयामार्फत सूचित करण्यात आले असून सर्वांनी सभागृहात उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात येत आहे. राज्यपाल यांच्या निदेशानुसार हे विशेष अधिवेशन बहुमत चाचणीसाठी अभिनिमंत्रित करण्यात आले आहे, अशी माहिती विधानमंडळ सचिवालयाचे जनसंपर्क अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या