Header Ads Widget

“टॉप मॉडेल ऑफ विदर्भ” स्‍पर्धेमध्‍ये “मिसेस विदर्भ” म्‍हणून डॉ.सोनाली हेमंत ठाकरे यांची निवड

    डिव्‍हाईन इव्‍हेनट्स तर्फे “टॉप मॉडेल ऑफ विदर्भ” स्‍पर्धेचे आयोजन
    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : डिव्‍हाईन इव्‍हेनट्स तर्फे “टॉप मॉडेल ऑफ विदर्भ” स्‍पर्धेचे आयोजन करण्‍यात आले होते. सदर स्‍पर्धा ही १९ जुन रविवारी मणिरत्‍नम रिसोर्ट नागपुर रोड येथे आयोजित करण्‍यात आली होती.

    सदर कार्यक्रमात भाजपा शहर अध्‍यक्ष श्री.किरण पातुरकर व श्री.अविनाश मार्डीकर, यश गिरोळकर (सुलतान शंभू सुभेदार) चे अॅक्‍टर, संजना पंडीत हे प्रमुख अतिथी म्‍हणुन तसेच माधुरी धर्माळे उपस्थित होते. सदर स्‍पर्धेत अमरावती, अकोला तथा नागपुर म्‍हणजेच विदर्भातुन अनेक मॉडेलसनी सहभाग घेतला होता. ह्या कार्यक्रमासाठी ज्‍युरी म्‍हणुन श्रीमती प्रविणा दंदे व शितल चौधरी हे लाभले होते. या स्‍पर्धेत डॉ.सोनाली हेमंत ठाकरे ह्यांची “मिसेस विदर्भ” म्‍हणून निवड करण्‍यात आली. डॉ.सोनाली ह्या दंत चिकीत्‍सक असुन प्राध्‍यापक म्‍हणुन डेंटल कॉलेज येथे कार्यरत आहेत.

    प्रस्‍तुत कार्यक्रमाचे आयोजनात श्रीमती राधा परिक्षीत ढेकेकर, पुजा वानखडे, श्रेया लाडेकर, आशिष चंडाले, डॉ.शितल चौधरी, मनिषा बारब्‍दे, राशी काकडे, शुभांगी कावडे, स्‍नेहल सुने तथा त्‍यांच्‍या चमुने मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्‍वी केला. ह्या कार्यक्रमाला प्रियंका रेलेकर, रिहान अन्‍सारी ह्यांनी फॅशन शो ग्रोमींग केले. अंचोर परेश ह्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढविली. प्रस्‍तुत कार्यक्रमाचे प्रयोजक हे आराधना, ए मिस्‍टर, मणिरत्‍नम रिसोर्ट होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या