Header Ads Widget

इयत्‍ता १० वीच्‍या परिक्षेत उत्‍तीर्ण झाल्‍याबद्दल माजी गटनेता चेतन पवार यांनी केला सत्‍कार

    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : मोतीनगर, अंबिका नगर, जयन्‍त कॉलनी, किरण नगर नं.२ येथील विद्यार्थ्‍यांनी दहावीची परिक्षा उत्‍तीर्ण होवून नेत्रदीपक यश मिळविले आहे. इयत्‍ता १० वीच्‍या परिक्षेत मोतीनगर येथील कु.ईश्‍वरी विजय खेतकडे हिने ८३.६० टक्‍के, श्रीनिवास अपार्टमेंट अंबिका नगर येथील कु.पलक अनिल किंगरानी हिने ९२.६ टक्‍के, जयन्‍त कॉलनी येथील कु.सृष्‍टी यशवंत पागरुत हिने ९४.२५ टक्‍के, किरण नगर नं.२ येथील क्रिष्‍णा प्रणित भस्‍मे यानी ९४.८० टक्‍के गुण मिळवून उत्‍तीर्ण झाली आहे. या विद्यार्थ्‍यांनी आत्मविश्वासाच्या बळावर मोठे यश संपादन केले. केवळ प्रबळ आत्मविश्वासाच्या बळावर मोठे यश संपादन करणाऱ्या ४ गुणवंत विद्यार्थ्‍यांचे अत्यंत अभिमानाने अभिनंदन व सत्कार माजी उपमहापौर तथा माजी गटनेता चेतन पवार यांनी केला. तसेच ४ विद्यार्थ्‍यांनी चांगल्‍या अंकांनी उत्‍तीर्ण झालेल्‍या विद्यार्थ्‍यांचे शैक्षणिक मनोबल वाढावा याकरिता सन्‍मान करुन विद्यार्थ्‍यांना उज्‍वल भविष्‍याकरिता मनःपुर्वक शुभेच्‍छा दिल्‍या.

    यावेळी बाळासाहेब होले, गजुभाऊ मुदगल, संदिप इंगळे, दिपक इंगळे, विजयराव खेतकडे, अनिल किंगराणी, किशोर देशमुख, बंडूभाऊ ठाकरे, चेतनभाऊ वाठोडकर, चंद्रकांत भिसे, यशवंत पागरुत, गजानन कडू, लताताई पागरुत उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या