अमरावती (प्रतिनिधी) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा अंर्तगत कर्मविर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान येजना सन 2004-05 कार्यान्वित करण्यात आलेली आहे.योजने अंतर्गत अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील दारीद्रय रेषेखालील भुमिहीन शेतमजुराच्या कुटुंबाचे जिवनमान उचाविण्याकरीता कुटुंबाना चार एकर कोरडवाहु व दोन एकर बागायती जमीन 100 टक्के अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येते.
योजने अंतर्गत सन 2021-22 आर्थिक वर्षात शासनाकडुन खरेदी करण्यात आलेली जमीन मौजे तिवसा भाग-2 येथील शरद यादवराव लेवटे, दिपक हरी वाघमारे, सागर सुरेश वाघमारे, नंदा सुनिल पाटील, छाया बलदेव कापसे असे एकूण पाच लाभार्थ्याना मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष कर्मविर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना जिल्हास्तरीय समिती यांचे शुभहस्ते दिनांक 22 जून 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जमीनीचे पट्टे व आदेश वितरीत करण्यात आलेले आहे.
या प्रसंगी संबंधित लाभार्थ्यांना जमीनीचे पट्टे वितरीत करून लाभार्थ्यानी जमीनीचा उपयोग घेवुन चागंली शेती करावी व त्यावर आधारीत लघु उद्योग करावे तसेच या लाभार्थ्यांना सामाजिक न्याय विभागा अंतर्गत अनुसूचित जाती उपयोजना मधुन इतर विभागाच्या योजनांचा सुध्दा प्राधान्याने लाभ देण्यात यावा असे, जिल्हाधिकारी यांनी नमुद केले. या वेळी योजनेचे सदस्य सचिव सहायक आयुक्त श्रीमती माया केदार हया उपस्थित होत्या.योजनेचा लाभ देवुन आम्हास जमीन देवून आमच्या उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध करुन दिल्या बाबत शासनाचे तसेच मा. जिल्हाधिकारी यांचे आभार संबंधित लाभार्थ्यांनी व्यक्त केले. असे आवाहन सहायक आयुक्त, माया केदार यांनी कळविले आहे.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या