Header Ads Widget

तोंडाला येणारी दुर्गंधी ही अनेकांची समस्या..!

  अन्नातून शरीरात जाणार्या0 प्रथिनांचे विघटन करणे हे बॅक्टेरियांचे प्रमुख काम. पण, शरीरात बिघाड निर्माण झाल्यास बॅक्टेरियांच्या कामात अडथळे येतात. ते योग्य पद्धतीने प्रथिनांचे विघटन करू शकत नाहीत. यामुळे तोंडाला एक प्रकारचा वास येऊ लागतो. तोंडाला येणारी दुर्गंधी ही अनेकांची समस्या असते. त्यावर उपाय म्हणून आपण एखादी मिंटची गोळी चघळतो किंवा दात घासतो. यामुळे तोंडाची दुर्गंधी तात्पुरती कमी होते. पण, तोंडाच्या दुर्गंधीचा संबंध एखाद्या आरोग्यविषयक समस्येशीही असू शकतो. त्यामुळे तोंडाच्या दुर्गंधीकडे एक साधीशी समस्या म्हणून दुर्लक्ष करता कामा नये.

  तोंडाच्या दुर्गंधीचे कारण

  काही प्रकारच्या बॅक्टेरियांमुळे तोंडाला दुर्गंधी येते. हे बॅक्टेरिया जीभ, घसा आणि टॉन्सिल्सच्या मागच्या भागात असतात. अन्नातून शरीरात जाणार्याब प्रथिनांचे विघटन करणे हे या बॅक्टेरियांचे प्रमुख काम. पण, शरीरात बिघाड निर्माण झाल्यास या बॅक्टेरियांच्या कामात अडथळे येतात. ते योग्य पद्धतीने प्रथिनांचे विघटन करू शकत नाहीत. यामुळे तोंडाला एक प्रकारचा वास येऊ लागतो.

  तोंडाची दुर्गंधी आणि आजार

  तोंडाला अमोनियायुक्त वास आल्यास हे मधुमेहाचे लक्षण असू शकते. हे निदान न झालेल्या टाईप वन मधुमेहाचे लक्षण असू शकते. मधुमेहामुळे शरीरात इन्शुलिनची कमतरता निर्माण झाल्याने शरीर ऊर्जा मिळवण्यासाठी साखरेचा वापर करू शकत नाही. त्याऐवजी शरीर चरबीचा वापर करते. यामुळे 'केटॉन्स' या निरूपयोगी घटकाची निर्मिती होते आणि तोंडाला अमोनियायुक्त दुर्गंधी येते. या समस्येबरोबरच सतत तहान लागणे, प्रचंड थकवा येणे, वजन घटणे, सतत लघवीला जावे लागणे अशा समस्या दिसल्यास तातडीने तपासणी करून घ्यावी. सायनसच्या समस्येमुळे तोंडाला डांबराच्या गोळ्यांसारखा वास येतो. नाक चोंदल्याने किंवा घसा बसल्याने निर्माण होणार्यास कफात तीव्र स्वरूपाची प्रथिने असतात. या प्रथिनांचे विघटन न झाल्याने तोंडाला डांबराच्या गोळ्यांसारखा दुर्गंध येतो.

  कबरेदकेविरहित उच्च प्रथिनयुक्त आहार घेत असल्यास तोंडाला नासलेल्या दुधासारखा वास येतो. ऊर्जा मिळवण्यासाठी शरीराला कबरेदके मिळत नाहीत, अशा वेळी शरीर चरबी आणि प्रथिने वापरायला सुरुवात करतं. आहारातल्या अतिरिक्त प्रथिनांमुळे तोंडाला अशा प्रकारची दुर्गंधी येते. आहारात कबरेदकांचा समावेश करणे हा त्यावरचा एक उपाय आहे.

  टॉन्सिल्सची समस्या असेल तर तोंडाला सल्फरयुक्त दुर्गंंधी येते. टॉन्सिल्स विकारामुळे बॅक्टेरियांना प्रथिनांचे विघटन करणे अवघड जाते. अपवादात्मक परिस्थितीत याचा संबंध यकृताच्या सोरायसिसशीही असू शकतो. बर्यािच वेळा टॉन्सिल्सची समस्या कोणत्याही औषधांशिवाय आठवडाभरात बरी होते. हे लक्षात घेता भरपूर पाणी प्यावे आणि खळखळून चूळ भरावी.

  सकाळी उठल्यावर तोंडाला काही प्रमाणात दुर्गंधी येतेच. पण दात घासल्यानंतरही मुखाची दुर्गंंधी न गेल्यास कुठे तरी पाणी मुरतंय हे समजावे. तोंड कोरडें पडण्याची तक्रार असणार्यांतना ही समस्या जाणवू शकते. अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेऊ न भरपूर प्रमाणात पाणी प्यावे. मासे न खाताही तोंडाला माशासारखा वास येत असेल तर हा किडनी विकाराचा संकेत असू शकतो. तुमच्या किडन्या नीट काम करत नसतील तर शरीरात नायट्रोजनचे प्रमाण वाढते आणि तोंडाला माशासारखा वास येतो. अशा वेळी तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊ न तपासणी करावी. माऊथ फ्रेशनर वापरणे, चुईंग गम चघळत राहते आदी मुखाची दुर्गंंधी दूर करणारे तात्पुरते उपाय आहेत. म्हणून मुख्य कारणांवर इलाज व्हायला हवा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या