Header Ads Widget

गझल

    चोरला मुद्दाम पान्हा पावसाने
    की सुपारी घेतली त्याची ढगाने
    येत होता आज भेटीला धरेच्या
    पाहिले त्याला असावे अंबराने
    रोज दिसतो या ढगांचा रंग काळा
    पांढरे होतील केव्हा पावसाने ?
    कास्तकारी सांग वाहावी कशी रे
    फस्त केले सर्व दाणे पाखराने
    कर्जबाजारी किती व्हावे अजूनी
    एकदा माफी दिली मज शासनाने
    काक पोटी ओरडूनी चैन उडवी
    लागलेली झोप हरली गाढवाने
    जर असे वाटेत येती धोंड माझ्या
    मग कसे सांगा जगावे पामराने ?
    ठेवले होते जपूनी पीक पाणी
    घातला हैदोस तेथे माकडाने
    तो गुराखी दोहतो गाईस आहे
    दूध नाही काय प्यावे वासराने
    अरुण विघ्ने

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या