अमरावती : खासदार नवनीत रवी राणा यांनी पंढरपूरसाठी विठ्ठलभक्त यांच्या दर्शनासाठी रेल्वेची सोय व्हावी यासाठी वरिष्ठ रेल्वे प्रशासनाकडे मागणी केली होती.
रेल्वे प्रशासनकडून रेल्वेचा शेडूल खासदार राणा यांना प्राप्त झाला आहे ज्यामध्ये नवी अमरावती स्टेशन वरून पंढरपुर साठी ट्रेन क्रमांक ०१११९ दिनांक ०६ व ०९ ,०७-२०२२ रोजी असे दोन दिवस गाडी पंढरपूर साठी गाडी रवाना होईल. परतीच्या प्रवासासाठी ट्रेन क्रमांक ०११२०दिनांक ०७ व १०-०७-२०२२ असे दोन दिवस गाडी पंढरपूर वरून नवी अमरावती कडे रवाना होईल या रेल्वेगाडीला एकूण 18 डबे असतील. अशी माहिती खासदार अमरावती यांचे जनसंपर्क कार्यालयाचे उमेश ढोणे यांनी सांगीगीले.
खा. राणा ह्या इतरही रेल सुविधेसाठी महाव्यवस्थापक मुंबई यांचे कडे पाठपुरावा करत आहे त्यांनी पत्र लिहून रेल सबंधी. मागण्या केल्या आहेत असेही त्यांचे खाजगी सचिव उमेश ढोणे यांनी सांगीतले.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या