धुळे : राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागांतर्गत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, धुळे या कार्यालयातर्फे जिल्ह्यातील खुला प्रवर्ग व इतर मागासप्रवगार्तील एक लाख रुपयांपेक्षा वार्षिक उत्पन्न कमी असलेल्या शेतकरी, शेतमजूर, निराधार, विधवा, परितक्त्या महिलांच्या केवळ दोन मुलींच्या विवाहाकरीता राज्य शासनाच्या विशेष पॅकेजमधून शुभमंगल सामूहिक विवाह/नोंदणीकृत विवाह योजना जिल्ह्यातील नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थामार्फत राबविण्यात येणार आहे.
विवाह करणार्या जोडप्यास दहा हजार रुपये, तर सामूहिक विवाहाचे आयोजन करणार्या संबंधित संस्थेस एका दांपत्यामागे रुपये दोन हजारांचे अनुदान देण्यात येणार आहे, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सचिन शिंदे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये शासकीय कळविले आहे.महिला व बालविकास विभाग अधिकारी, धुळे या कार्यालयामार्फत शुभमंगल सामूहिक विवाह योजना जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर कुटुंबातील मुलींच्या लग्नासाठी राज्य शासनाच्या विशेष पॅकेजमधून सामूहिक विवाह/नोंदणीकृत विवाह योजना खुला प्रवर्ग व इतर मागास प्रवगार्साठी राबविण्यात येणार आहे. तसेच नोंदणीकृत विवाह करणार्या खुला प्रवर्ग व इतर मागासवर्गीय दांपत्यांना या योजनेंतर्गत दहा हजार रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे. ज्या नोंदणीकृत संस्था ही योजना राबविण्यासाठी उत्सुक असतील तसेच नोंदणीकृत विवाह करणा?्य खुला प्रवर्ग व इतर मागासवर्गीय दांपत्यांनी त्वरीत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, प्लॉट क्रमांक ५२, जयहिंद कॉलनी, देवपूर, धुळे येथे संपर्क साधून विहित नमुन्यात प्रस्ताव सादर करावेत, असेही आवाहन करण्यात आले आहे.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या