- शिव राज्याभिषेकाने
- गड किल्ले उजळले,
- पशू पक्षी झाडे वेली
- चराचर सुखावले,
- रायगडी सिंहासनी
- शिवराय विराजले !धृ!
- काय सांगू गड्या तूला
- जन सारे आनंदले,
- आनंदा ना पारावार
- काळे संकट टळले,
- रायगडी...१
- गनिमाला चिरडण्या
- शिव प्रभू राजे झाले,
- लेकीबाळी सानथोर
- फेर धरुन नाचले,
- रायगडी....२
- शेतकरी कष्टकरी
- वाटू साखर लागले,
- अन्यायाला निवारण्या
- न्याय प्रिय राजे झाले,
- रायगडी.....३
- शेतीवाडी गोरं ढोरं
- प्रेमभरे शहारले,
- चारापाणी बी बियाणे
- विनासायस लाभले,
- रायगडी....४
- सैन्य अठरापगडी
- सारे प्रेमाणं जपले,
- सुख दुःख ही तयांचे
- सदा मानले आपले,
- रायगडी....५
- देवालये नि मशीदी
- धन देऊन जपले,
- सर्वधर्म समभाव
- तत्व सदा स्वीकारले,
- रायगडी.....६
- सारे उदीम व्यापारी
- मनोमन सुखावले,
- संरक्षण मावळ्यांचे
- बहुप्रेमाणं लाभले,
- रायगडी....७
- दूर दृष्टी किती पहा
- आरमार उभारले,
- धोका सागर सीमेचा
- तट दूर्ग ते बांधले,
- रायगडी.......८
- युद्धनीती राजनीती
- नवे आदर्श निर्मिले,
- विस्तारुनिया स्वराज्य
- शत्रू जेरीस आणले,
- रायगडी......९
- मोजमाप जमीनीचे
- महा कार्य हे ठरले,
- पेढी बियांची स्थापिली
- कृषीवल धन्य झाले,
- रायगडी.......१०
- स्वाभिमानानं वागणे
- लोकांमधी रुजवले,
- असा आदर्श हा राजा
- नाव जगी हे गाजले,
- रायगडी.....११
- स्वप्न जिजाऊ मातेचे
- असे वास्तवा आणले,
- आण रायरेश्वराची
- आज स्वराज्य स्थापले,
- रायगडी सिंहासनी
- शिवराय वाराजले ...१२
- -सुधीर शेरे
- ९१६७००५०७७
0 टिप्पण्या