Recent in Technology

Advertisement

Breaking News

प्रधानमंत्री आवास योजनेच्‍या घरांची आयुक्‍तांनी केली पाहणी

    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) :

      अमरावती महानगरपालिका आयुक्‍त डॉ.प्रवीण आष्‍टीकर यांनी शुक्रवार दिनांक २४ जुन,२०२२ रोजी मौजा म्‍हसला येथील प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत बांधण्‍यात आलेल्‍या घरांची पाहणी केली. या पाहणी दौरा दरम्‍यान अतिरिक्‍त आयुक्‍त हर्षल गायकवाड, तांत्रिक सल्‍लागार जिवन सदार, प्रधानमंत्री आवास योजनेचे उपअभियंता सुनिल चौधरी, जनसंपर्क अधिकारी भुषण पुसतकर उपस्थित होते.

      म्‍हसला सव्‍है क्रमांक २१/फ येथे ६० सदानिकांचे बांधकाम पूर्ण झाले असून वर्षभरापूर्वीच त्‍या सदनिका लाभार्थ्‍यांना वितरीत करण्‍यात आले आहे तर सव्है क्रमांक २२ येथे ९६ सदानिकांचे बांधकाम पुर्ण होत आले आहे व ते लवकर वितरीत करण्‍याच्‍या सुचना आयुक्‍तांनी दिल्‍या. सदर इमारती लवकरच पुर्ण होणार असून या ठिकाणी ज्‍या लाभार्थ्‍यांना घरे मिळाली आहे त्‍यांना लवकरच स्‍वत:हाच्‍या घरात राहायला मिळेल असेही यावेळी आयुक्‍तांनी म्‍हटले.

      प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत अमरावती महानगरपालिका हद्दीत मौजा म्‍हसला व नवसारी येथील भुखंडावर इमारतीचे निरीक्षण करुन संबंधीत अधिका-यांना समवेत कामाचे नियोजन व काम पुर्ण करण्‍याकरिता येणा-या अडचणी याबाबत सविस्‍तर चर्चा करण्‍यात आली व इमारतीचे बांधकाम तात्‍काळ पुर्ण करण्‍याच्‍या सुचना यावेळी त्‍यांनी दिल्‍या. तसेच सुरु असलेल्‍या कामाच्‍या गुणवत्‍ते बाबत समाधान व्‍यक्‍त केले.

      या ठिकाणी महानगरपालिकेने प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत अनेक लाभार्थ्‍यांना लाभ मिळवून दिला. या परिसरात या योजनेचा अनेक नागरिकांनी लाभ घेतला असून त्‍यांचे आज स्‍वत:हाचे पक्‍के घर झाले आहे. प्रत्‍येक लाभार्थी हा आपल्‍या घराबाबत समाधानी दिसून आला. या योजनेतून मिळालेल्‍या निधीमुळे आमचे घर होवू शकले असेही यावेळी त्‍यांनी आपल्‍या भावना व्‍यक्‍त केल्‍या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code