Header Ads Widget

कु. ज्ञानवी इंगळेचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

    नितीन पवार
    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    कुऱ्हा (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे द्वारा जाहीर करण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत मदर तेरेसा न्यू इंग्लिश स्कुल अंजनसिंगी ची विद्यार्थिनी कु.ज्ञानवी स्वाती नरेश इंगळे हिने इयत्ता दहावीच्या परीक्षेत (इंग्रजी माध्यम) घवघवीत यश संपादन केले आहे.

    कु.ज्ञानवीने एकूण ९२ प्रतिशत गुण प्राप्त केले आहे. गणित विषयात ९६, विज्ञान आणि तंत्रज्ञान ९७, समाज विज्ञान ९४, हिंदी ९४, मराठी ७९ आणि इंग्रजी ६४ असे गुण मिळविले आहे.कु.ज्ञानवीने नर्सरी ते इयत्ता दहावी पर्यंत अध्ययनाचे धडे इंग्रजी माध्यमातून मदर तेरेसा न्यू इंग्लिश स्कुल अंजनसिंगी येथूनच घेतले आहे. कु. ज्ञानवीने आपल्या यशाचे श्रेय शाळेचे मुख्याध्यापक गुरुजन वर्ग तसेच आजी आजोबा आणि आई वडील यांना दिले आहे.सुयश प्राप्तीबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या