Recent in Technology

Advertisement

Breaking News

"पाऊस... "

    बरं झालं राज्या तू येळेवर आला
    ऊल्हासानं चेहरा फुलाले लागला !
    आता कशी तरी सुखानं झोप लागन
    होवो जावो काही लोकं पेराले लागन !
    मागल्या वर्सी जरा कमीच आल्ता
    ह्या वर्सी कमी नको, बरस भल्ता !
    गावातले लोक कसे हालाले लागले
    पशू पक्षी झाडं झुडूपं डोलाले लागले !
    बरं झालं शाया लागाच्या आंधीच आला
    पोट्याइचे पाटी, पुस्तक न् ड्रेसबी झाला !
    - अरुण विघ्ने

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code