Header Ads Widget

येरे पावसा पावसा...

  येरे पावसा पावसा
  नको येऊ रे लाजत
  येई वरात घेऊन
  तू रे वाजत गाजत !!
  आता बरस बरस
  नको गर्जु आभायात
  कडकडाट ईजेचा
  नको करू भयभीत !!
  रान तापलं तापलं
  भेगा पडल्या भुईले
  तहानले जीव सारे
  वर पाह्यती ढगाले !!
  बाप राबता राबता
  भेगा पडल्या पायाले
  कसं नशीब लीवलं
  रेखा वांझोट्या हाताले !!
  माह्या नभीच्या रे देवा
  धाड सांगावा मेघाले
  नको होऊस फितूर
  आस लागली सर्वाले !!
  -वासुदेव महादेवराव खोपडे
  सहा पोलीस उपनिरीक्षक(सेवानिवृत्त)
  अकोला
  9923488556

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या