Featured Post

Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

दयाघना...

    अशी तापते धरणी
    वारा उधळतो खूर
    वळीवाची वर्दी देत
    वीज कडाडते दूर
    नाही कुठला सांगावा
    येई धिंगाणा घालीत
    नको नको रे वळीवा
    पुन्हा चिखल मातीत
    दाळी साळी वाळवणं
    दारी तशीच पडून
    इथं वखूत कामाचा
    गेलं जळणं भिजून
    गाई वासरे रानांत
    गेला धनी राखणीला
    असा नडला काहून
    आला चारा कापणीला
    नदी,नाल्या डाबरीत
    टंच भरलयं पाणी
    आला मिरुग तोंडाशी
    कशा होतील पेरणी?
    चारी दिशा ढवळल्या
    तुझ्या वादळी येण्यानं
    सुने सुने झाले खोपे
    अशा भयार्त पाण्यानं
    थांब जरासा ढगांशी
    कळा उन्हाच्या सोसत
    मग येशील मातीचा
    मृदगंध उडवत
    का रे उतावीळ असा?
    धावा तुझा अवकाळी
    दयाघना रे स्वप्नांना
    नको घेऊ पायदळी
    -सतिश कोंडू खरात
    वाशिम
    ९४०४३७५८६९

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code