यवतमाळ ( प्रति ) : यवतमाळ नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२२ च्या अनुषंगाने यवतमाळचे उपविभागीय अधिकारी तथा पिठासिन अधिकारी श्री अनिरुद्ध बक्षी आणि यवतमाळ न.प.च्या प्रशासक तथा मुख्याधिकारी माधुरी मडावी यांचे उपस्थितीत महिलांच्यासाठीची प्रभाग आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार अनुसुचित जातींच्या ५ अनुसूचित जमातींच्या ३ महिलांकरीता आरक्षित जागांसह उर्वरित प्रभागात सर्वसाधारण महिलांच्या २१ आरक्षित जागा मिळुन महिलांच्या २९ जागांची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे.
आरक्षण सोडत जाहीर करतांना श्रमिष्ठा नितीन मेश्राम, वंशीका राजु खत्री, प्रबुध्दी प्रदिप कोटरंगे, आरव बादल नंदपटेल, सोज्वल अनिल जुनघरे, समर्थ विनोद राऊत, यांनी क्रमवार पद्धतीने ईश्वरचिठ्ठी काढली. त्यानुसार अनुसुचित जाती करीता आरक्षित प्रभाग क्रमांक १, २, ७, ८, ९, १०, ११, १४, २८ या ९ प्रभागांच्या ९ चिठ्ठ्यांपैकी ५ चिठ्ठ्या काढण्यात आल्यात त्यामध्ये प्रभाग क्रमांक ८, १०, ९, २, व ७ या प्रभागातील प्रत्येकी अ जागा याप्रमाणे ५ जागा अनुसूचित जाती महिलांकरीता आरक्षित झाली आहे.तर वरील ९ प्रभागांपैकी १, ११, १४, व २८ यामध्ये प्रत्येकी "अ" जागा याप्रमाणे ४ जागा अनुसुचित जाती खुला असे आरक्षण राहणार आहे.
अनुसुचित जमातीसाठी आरक्षित असलेल्या प्रभाग क्रमांक ३, ५, १८, २५ व २९ या ५ प्रभांगाच्या चिठ्यामधुन मुलामुलींनी ३ चिठ्ठ्या काढल्या त्यानुसार प्रभाग क्रमांक ३, १८, २५ यामधिल प्रत्येकी "अ" जागा याप्रमाणे ३ जागा अनुसूचित जमाती महिलांसाठी आरक्षित करण्यात आली आहे. तर प्रभाग क्रमांक ५ व २९ मधील प्रत्येकी "अ" जागा याप्रमाणे २ जागा अनुसुचित जमाती करीता खुल्या राहणार आहेत.
प्रभाग क्रमांक १, ४, ५, ६, ११, १२, १३, १४, १५, १६, १७, १९, २०, २१, २२, २३, २४, २६, २७, २८, २९, यामधील प्रत्येकी "अ " जागा याप्रमाणे २१ जागा सर्वसाधारण महिलांकरीता आरक्षित करण्यात आली आहे. अनुसुचित जाती-५, अनुसुचित जमात-३,व सर्वसाधारण महिला-२१ असे महिलांकरिता ५० टक्के जागांची आरक्षण राहणार आहे.दिनांक १३ जुन २०२२ रोजी सकाळी ११:२० वाजता ही आरक्षण सोडत न.प. प्रशासकीय भवनाच्या ४ थ्या माळ्यावरील सभागृहात संपन्न झाली. यावेळी शहरातील राजकीय पक्षांचे मान्यवर पदाधिकारी, माजी न.प. सदस्य व सदस्या, प्रतिष्ठीत नागरिक, पत्रकार बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या