Header Ads Widget

कृषी संजीवनी मोहिमेमध्ये शेतकरी बांधवांनी सहभागी व्हावे; कृषी विभागाचे आवाहन

    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त अमरावती विभागात 25 जून ते 1 जुलै 2022 या कालावधीत कृषी संजीवनी मोहिम राबविण्यात येणार आहे.

    या मोहिमे अंतर्गत विभागातील सर्व कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन विविध पिकांचे लागवड तंत्रज्ञान, प्रिशिक्षण, शेतीशाळा, बीजप्रक्रीया, खते कीडनाशके वापर, शेतीपूरक व्यवसाय तंत्रज्ञान इत्यादी विषयी मार्गदर्शन करणार आहेत. या मोहिमेत रिसोर्स फार्मर, कृषी विज्ञान केंद्र व कृषी विद्यापिठांचे शास्त्रज्ञ यांचाही सहभाग होणार आहे. यंदाचा खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी एकत्रित मोहिमेसाठी प्रयत्न केले जाणार आहे. या मोहिमेत सर्व शेतकरी बांधवांनी सहभागी होऊन नविन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

    मोहिमेत एका सप्तामध्ये दररोज गाव बैठका, प्रात्यक्षिके, शेतीशाळा, प्रशिक्षण ऑनलाईन चर्चासत्रांचे आयोजन करण्यात यणार आहे. 25 जुन रोजी एकात्मिक कापुस व सोयाबिन पिकाची उत्पादकता वाढ व मुल्यसाखळी विकास कार्यक्रम, 26 जुन रोजी पौष्टिक तृणधान्य दिवस, 27 जुन रोजी महिला कृषी तंत्रज्ञान सक्षमीकरण दिवस, 28 जुन रोजी खत बचतदिन, 29 जुन रोजी प्रगतशील शेतकऱ्यांशी संवाद दिवस, 30 जुन रोजी शेतीपुरक व्यवसाय तंत्रज्ञान दिवस आणि 1 जुलै रोजी कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिनाचे आयोजन करून मोहिमेची सांगता येणार आहे. अशा प्रकारे, पुर्ण सप्ताहभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून मोहिम साजरी करण्यात येणार आहे. तरी विभागातील सर्व शेतकरी बांधवांनी कृषी संजीवनी मोहिमेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन लाभ घ्यावा. व नविन तंत्रज्ञानाचा वापर करून आपले उत्पन्न वाढवावे, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक,के.एस. मुळे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या