मुंबई : खूप प्रतिक्षेनंतर अखेर बातमी कानावर पडतेय की निर्माता फिरोज नाडियादवाला लवकरच कॉमेडी सिरीज हेराफेरीचा तिसरा भाग घेऊन आपल्या भेटीस येतोय. लवकरच तो सिनेमाची घोषणा करणार असल्याचे बोलले जात आहे. फिरोजने सांगितले आहे की या सिनेमातले मूळ कलाकार अक्षय कुमार,परेश रावल,सुनिल शेट्टी हेच मुख्य भूमिकांमध्ये दिसणार आहेत. हा कॉमेडी सिनेमा २000 साली प्रदर्शित झाला होता. १९८९ मध्ये मल्याळम सिनेमा ह्यरामजी राव स्पीकिंग याचा तो रीमेक होता.
२000 साली आलेल्या सिनेमाचा सिक्वेल २00६ साली रिलीज झाला होता. यामध्ये अक्षय कुमार,परेश रावल,सुनील शेट्टी हे तिघे राजू,बाबूराव,श्याम या व्यक्तिरेखा साकारताना दिसले होते. फिरोज नाडियादवालानं ह्यहेराफेरी २ ची निर्मिती केली होती. या सिनेमाच्या तिसर्या भागाची फिरोज नाडियादवालाच निर्मिती करणार आहे.
फिरोज म्हणालेयत की, ह्यप्रेक्षकांची प्रतिक्षा लवकरच संपेल. सर्वजण याचा तिसरा भाग पाहू शकतील. ते देखील-अक्षय,सुनिल आणि परेश या तगडया जुन्या टीमसोबत. कथा तयार आहे. आम्ही काही गोष्टींवर काम करीत आहोत. जुन्या सिनेमासारखाच हा देखील सिनेमा बनवला जाईल. व्यक्तीरेखांमधील भोळेपणा तसाच कायम राहिल. पण अजूनही ठाम असं सांगता येणार नाही. कथा,पटकथा,व्यक्तिरेखा आणि त्यातील बदल याबाबतीत आणखी थोडा वेगळा विचार करुन गरज भासली तर तसे बदल करता येतील.
हेराफेरीच्या या तिसर्या भागाचे दिग्दर्शन कोण करणार? याविषयी बोलताना फिरोज नाडियादवाला म्हणाले की,आम्ही काही जणांची नावे फायनल केली आहेत. त्यांच्याशी बोलणं सुरू आहे. लवकरच यासंदर्भात घोषणा केली जाईल. या सिनेमाचा पहिला भाग प्रियदर्शननं दिग्दर्शित केला होता. दुसरा नीरज वोरानं. दुसरा भाग दिग्दर्शकानेच लिहिला होता. तिसरा भाग ही मोठी जबाबदारी आहे कारण लोकांच्या आशा वाढल्यात.
हेराफेरी ३ २0१४ सालीच येणार होता. पण गणितं जुळून आली नाहीत आणि सिनेमा पुढे ढकलला गेला. नीरज वोराच त्यावेळी सिनेमाच्या तिसर्या भागावर काम करीत होता. पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे तो प्रोजेक्ट पुढे ढकलला. २0१७ मध्ये निरज वोराचं निधन झालं. एक वर्ष तो कोमात होते. त्यावेळी अक्षय या सिनेमाचा भाग बनणार नव्हता. जॉन अब्राहम,अभिषेक बच्चन यांचा सिनेमाच्या तिसर्या भागात तेव्हा समावेश होणार होता. पण सगळंच बारगळलं,पण आता कथानक बदलण्यात आलं आहे. आणि अक्षय कुमारही सिनेमात काम करायला तयार आहे.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या