Featured Post

Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

उत्कृष्ट कराटे प्रशिक्षणार्थींचा गौरव

    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे दि फायटर स्पोर्टस् क्लबच्या सहकार्याने उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिर राजेश्वर युनियन हायस्कूल येथे पार पडले. त्याचा समारोप नुकताच बडनेरा येथील सार्वजनिक कपिल बुद्ध विहारात झाला. त्यात उत्कृष्ट कराटे प्रशिक्षणार्थींचा गौरव करण्यात आला.

    मुलांमधून आर्यन नागदिवे, तर मुलींमधून समृद्धी निमगडे यांना रोख रक्कम व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय बाल कला सन्मानप्राप्त दिव्या अहिर, युवा पुरस्कार प्राप्त वैभव निमकर यांचाही गौरव झाला. शिबिरातील सहभागींना प्रशस्तीपत्रे देण्यात आली.

    विद्यार्थ्यांनी चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली. प्रशिक्षक सेन्साई सोनल रंगारी, मंगेश भोगाळे, डॉ. खुशाल अळसपुरे, सुरज सिद्धार्थ वरघट, उमेश मारोटकर, शुभम मोहतुरे, प्रकाश बनसोड, अमर कडू, प्रवीण मेश्राम, सेन्साई लक्ष्मण ढबाले, संघरक्षक बडगे, प्रशांत शेंडे, मनोज ठाकरे, श्रीकांत शिंदे, मानव चव्हाण, अल्पेश वानखडे, आर्यसत्य रंगारी, आर्यन जैन, ओम ब्राह्मणकार , स्रवस्ती काठाने, राधिका गणवीर आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code