Header Ads Widget

दर्यापूर येथील शासकीय मागासवर्गीय वसतिगृहातील प्रवेश प्रक्रिया सुरू

    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : दर्यापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहातील प्रवेशासाठीचे अर्ज वितरित होत आहेत. इच्छूकांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

    वसतिगृहात उत्तम निवास व्यवस्था, सकस भोजन, ई-लायब्ररी, इतर सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. कॉलेजच्या विद्यार्थ्यांना स्टेशनरीसाठी चार हजार, गणवेशाकरिता दोन हजार, तर शालेय विद्यार्थ्यांना गणवेशाकरिता एक हजार, प्रत्येक प्रवेशित विद्यार्थ्यांना प्रतिमहा पाचशे रू. निर्वाह भत्ता देण्यात येतो.

    येथे अनुसूचित जातीकरिता 80 टक्के प्रवेश, व्हीजेएनटी 5 टक्के, आर्थिक मागासवर्गीयाकरिता 5 टक्के, अनुसूचित जमाती 3 टक्के, विशेष मागासवर्गीय 2 टक्के, अपंग 3 टक्के, अनाथ 2 टक्के असे वसतिगृह प्रवेशितांसाठीचे आरक्षण आहे. इच्छूकांनी अर्ज करण्याचे आवाहन गृहपाल अनिल खेडकर यांनी केले.

    (छाया : संग्रहित)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या