Header Ads Widget

अखिल महाराष्ट्र साहित्य मंच या संस्थेच्या वतीने गझल व लावणी संमेलनाचे यशस्वी आयोजन

    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : अखिल महाराष्ट्र साहित्य मंच या संस्थेच्या वतीने दिनांक २५/५/२०२२ ते २६/५/२०२२ या दिवशी गझल व लावणी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. सदर संमेलन गुगल मीटवर ऑनलाईन घेण्यात आले होते.

    २५/५/२०२२ या दिवशी गझलरजनी या नावाने गझल मुशायरा घेण्यात आला होता . गझलकार योगेश चाळके मुक्तासुत यांच्या अध्यक्षतेखाली सदर मुशायरा पार पडला. महाराष्ट्राच्या मातीत गझल हा साहित्य प्रकार आपले वर्चस्व कायम करीत आहे महाराष्ट्राच्या साहित्य प्रकारातील एक अविभाज्य घटक गझल आहे. असे मत त्यांनी व्यक्त केले तसेच उत्तम गझल लिहिण्यासाठी अनेक कानमंत्र त्यांनी गझलकारांना दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती काळे यांनी आपल्या सुरेल शैली मध्ये केले. आमंत्रित गझल कारांचे आणि रसिकांचे स्वागत अतुल जी दिवाकर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आरती लाटणे यांनी केले. सदर कार्यक्रमात शिल्पाताई सकळकळे,मेघना पाटील, संतोष तांबे, प्रिया मयेकर, अतुल दिवाकर, गौरी शिरसाट,सिमा झुंजारराव, अरुण सावंत, पल्लवी उमरे, स्वाती काळे यांनी आपल्या सुंदर गझला सादर केल्या. आणि पंच कमिटीच्या सदस्य प्रियाताई मयेकर यांनी शेवटी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाचा समारोप केला.

    दुसऱ्या दिवशी म्हणजेत २६/५/२०२२या दिवशी लावण्याची शृंगार संध्या या नावाने लावणी संमेलन घेण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक अशोकजी कांबळे (नागपूर) होते. लावणी या साहित्य प्रकारातूनही समाज प्रबोधन करता येते अशा रचना साहित्यिकांनी निर्माण केल्या पाहिजेत असे सुंदर मत कांबळे सरांनी मांडले. सदर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी बहुजन विकास प्रतिष्ठान लिंगदेव संचित विश्वरत्न कलावंत सेवा भावी संस्थेचे संचालक मा. जयवंतराव आढाव हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेघनाताई पाटील यांनी केले व स्वागत स्वाती काळे यांनी केले.. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक मुक्तासुत अर्थात योगेश चाळके यांनी केले. प्रिया मयेकर, ज्योती अहिरे, प्रिया भालके,किरणताई मोरे चव्हाण, सिंधू बोदेले, स्वाती काळे यांनी आपल्या रचना सादर केल्या आणि शेवटी किरण ताई मोरे चव्हाण यांनी सर्वांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या