कालच दहावीचा निकाल घोषित झाला सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे स्वागत व अभिनंदन करण्यात आले निकाला अंती असे माहित पडले की ९०% व त्या पेक्षा अधिक गुणाधिक्य घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या बरीच वाढलेली आहे,त्याखालोखाल ८०,७०,६० टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील अधिक जास्त आहे.परंतु पुढील उच्च शिक्षण घेण्यासाठी गुणाधिक्यानुसार कुठे प्रवेश घ्यावा हा निर्णय पालक आणि विद्यार्थ्यांनी घ्यायचा आहे.
दोन वर्ष covid-19 मुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात बराच खंड पडलेला होता ५० ते ६० टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील उच्च शिक्षण घेणे अवघड झाले होते त्याकाळात दहावी पास मुला-मुलींना प्रवेश घेण्यासाठी सुमारे सहा महिने आयटीआयची प्रवेश प्रक्रिया सुरु होती. मुलामुलींचे १००% प्रवेश निश्चित झाले नव्हते.
राज्यातील सर्व आयटीआय मध्ये प्रवेश क्षमतांचा पूर्ण वापर व्हावा व प्रशिक्षणाच्या शंभर टक्के जागा भरल्या जाव्यात या हेतूने गठीत करण्यात आलेल्या समितीने दिलेल्या शिफारसी तसेच अन्य घटकांकडून प्राप्त झालेल्या सूचनांचा विचार करून कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग यांनी दिनांक २९ जून २०२१ च्या शासन निर्णयाप्रमाणे प्रवेशासाठी सुधारित नियमावली लागू करण्यात आली.
आयटीआय म्हणजे तंत्रकुशल कडून आर्थिक स्वावलंबनाकडे घेऊन जाणे हे होय सध्याच्या काळात जागतिक स्तरावर कौशल्य विकासाला फार मोठे महत्त्व प्राप्त झालेले आहे म्हणजे एखादी कला ज्यामध्ये तांत्रिक बाबी समाविष्ट असतात अशा कौशल्य प्राप्त विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी आपसूकच निर्माण होतात परंतु कोरोना काळापासून आयटीआय मध्ये प्रवेश घेणाऱ्यांकडून अल्पसा प्रतिसाद मिळत आहे हे चित्र पालटण्यासाठी व अधिकाधिक विद्यार्थी-विद्यार्थिनींना सहभाग घडवून आणण्यासाठी प्रवेश प्रोत्साहन अभियान हाती घेण्यात आले आहे. सदर अभियानांतर्गत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे कर्मचारी आदिवासी दुर्गम भागात जाऊन लॅपटॉप इंटरनेटच्या सुविधेसह प्रवेश घेण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना मार्गदर्शन करून त्यांच्याकडून प्रवेश अर्ज भरून घेतात.
या उन्हाळ्याच्या सुट्टीत जून महिन्यात आयटीआय स्तरावर स्कूल कनेक्ट हा उपक्रम सध्या राबविला जात आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या प्रवेशात वाढ होण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील प्रत्येक आयटीआय मध्ये राबविण्यात येणारे व्यवसाय अभ्यासक्रम, शिष्यवृत्ती योजना, स्वयं रोजगार प्रक्रिया, रोजगाराच्या उपलब्ध संधी इत्यादी माहिती परिसरातील शाळेमध्ये जाऊन दहावीत शिकत असलेले विद्यार्थी पालकांपर्यंत पोचविण्यासाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने प्रतिनिधी तसेच आयटीआय मधील प्राचार्य,गटनिदेशक, शिल्पनिदेशक मार्गदर्शन करीत आहे. या मोहिमेला चांगला प्रतिसादही मिळत आहे.
या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रवेश सत्र ऑगस्ट 2022 मध्ये केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे या संस्थेमध्ये एक व दोन वर्ष कालावधीचे ५० विविध व्यवसाय यांच्या तुकड्या मध्ये एकूण ११०४ प्रशिक्षणार्थींसाठी जागा उपलब्ध आहेत. या प्रशिक्षण कालावधीत मोठमोठ्या कंपन्या व कारखान्यांना भेटी देणे, उद्योगधंद्यातील तज्ञांची व्याख्याने मार्गदर्शन त्यांचा लाभ घेणे, कॅम्पस इंटरव्ह्यू आयोजित करून विविध कंपन्यांमध्ये शिकाऊ उमेदवारी उपलब्ध करून देणे तसेच भरती मेळाव्याच्या माध्यमातून उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी ही संस्था कार्यरत असते.
अमरावती आयटीआय मध्ये दरवर्षी विविध उपक्रम राबविले जातात त्यामध्ये प्रवेश प्रक्रिया ची सर्व कामे उदाहरणार्थ ऑनलाईन फॉर्म भरणे, ऑप्शन भरणे, फॉर्म सबमिट करणे इत्यादी सर्व सुविधा अत्यल्प व शासकीय दरात विद्यार्थ्यांना पुरवण्यात येतात, STRIVE योजनेअंतर्गत मुलींच्या सक्षमीकरणाकरीता येण्या जाण्यासाठी लागणारा प्रवास खर्च दिला जातो, मुला मुलींचे वसतिगृह, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना केंद्र शासनाने मंजूर केलेल्या दरानुसार शिष्यवृत्ती प्रदान केली जाते, इयत्ता दहावी उत्तीर्ण उमेदवारांनी दोन वर्ष कालावधीच्या अभ्यासक्रमात प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर बारावीची समकक्षता देण्यात येते. नामांकित औद्योगिक आस्थापने सोबत त्या संस्थेने सामंजस्य करार केलेले आहे कराराच्या माध्यमातून या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षण सुविधांचा दर्जा वाढ करणे,प्रशिक्षणार्थ्यांना अल्प मुदतीचे प्रशिक्षण देणे, ON JOB TRAINING, रोजगाराच्या संधी, निदेशक प्रशिक्षण अभ्यासक्रम, अद्यावत यंत्र सामग्री व उपकरणे उपलब्ध करून देणे याबाबत उपक्रम प्रथम प्राधान्याने राबविण्यात येतात. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण पूर्ण केल्यावर उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्गात थेट प्रवेश दिला जातो.
अशाप्रकारे दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आपले भविष्य उज्वल करण्यासाठी चलो आय टी आय की ओर असे आवाहन करण्यात येत आहे......
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या