यवतमाळ (प्रतिनिधी) : केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या वतीने जागतिक योग दिनाचे औचित्य साधून २१ जून रोजी सकाळी ६.३० ते ७.४५ दरम्यान जिल्हा क्रीडा संकुल, यवतमाळ येथे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, ज्येष्ठ योग प्रसारक यांच्या प्रमुख उपस्थितीत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रम हा केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, अमरावती, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, शिक्षण विभाग, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नेहरू युवा केंद्र, नगर परिषद प्रशासन, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, जिल्हा आरोग्य अधिकारी, होमगार्ड कार्यालय, पतंजली योग समिती, रविशंकर आर्ट ऑफ लिव्हींग, क्रीडा भारती, यवतमाळ जिल्हा हौसी असोसिएशन, यवतमाळ जिल्हा शारिरीक शिक्षण संघटना, आरोग्य भारती, संस्कार भारती, जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ, विविध योग समिती संघटना मंडळ तसेच विविध सामाजिक संस्था व संघटना यांच्या सयुंक्त विद्यमाने घेण्यात येत आहे.
शहरातील सर्व नागरिक, क्रीडा प्रेमी योग समिती, क्रीडा प्रशिक्षक, शिक्षक व विद्यार्थ्यानी बहुसंख्येने जिल्हा क्रीडा संकुल, यवतमाळ येथे सकाळी ६.३० वाजता उपस्थित राहावे व सोबत येताना पाण्याची बॉटल व चटई, मॅटस सोबत आणावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. आठव्या आंतरराष्ट्रीय योगदिनी जास्तीत जास्त संख्येने नागरिकानी उपस्थिती दर्शवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या