Featured Post

Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील अंजली भाभीची भूमिका असणाऱ्या अभिनेत्रीचे निर्मात्यांनी थकवले पैसे..!

    मुंबई : तारक मेहता का उल्टा चष्मा ही छोट्या पडद्यावरील प्रचंड गाजलेली मालिका आहे. गेली १४ वर्ष सलग ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेतील कलाकारांनी देखील लोकांच्या मनात घर केले आहे. अनेक कलाकारांनी ही मालिका सोडली त्या जागी दुसरे कलाकार आले मात्र मालिकेची लोकप्रियता कमी झाली नाही. असे असताना आता ही मालिका सोडून गेलेल्या एका अभिनेत्रीने तिला तिच्या मेहनतीचे पैसे अद्याप मिळेले नसल्याचा आरोप केला आहे.

    नेहा मेहता असे त्या अभिनेत्रीचे नाव असून तिने मालिकेत अंजली भाभीची भूमिका केली होती. नेहाने तब्बल १२ वर्ष ही भूमिका निभावली व तिची भूमिकाही इतर कलाकारांप्रमाणेच प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती. मी तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत तब्बल १२ वर्ष काम केले आहे. २0२0 मध्ये मी ही मालिका सोडली. त्याआधी काही महिन्यांपासूनच माझे पैसे दिले गेले नव्हते. मी मालिका सोडून दोन वर्ष उलटली अद्याप मला माज्या मेहनतीचे पैसे मिळालेले नाहीत. मालिका सोडल्यानंतर मी त्यांना फोन करून माझे पैसेही मागितले. मला सतत तक्रार करायला आवडत नाही. मला अजुनही आशा आहे की लवकरच यावर तोडगा निघेल व मला माझे पैसे मिळतील, असे नेहा मेहताने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

    लवकरच या मालिकेत दिसणार नवी दयाबेन

    तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील मुख्य किरदार असलेल्या दयाबेनच्या भूमिकेत लवकरच अभिनेत्री राखी विजन दिसणार आहे. याआधीची अभिनेत्री दिशा वाकानी ही गेल्या पाच वर्षांपासून मालिकेपासून दूर होती. ती परतेल अशी आशा निर्मात्यांना होती मात्र अखेर दिशाच्या जागी राखीची निवड करण्यात आलेली आहे.मुंबई- तारक मेहता का उल्टा चष्मा ही छोट्या पडद्यावरील प्रचंड गाजलेली मालिका आहे. गेली १४ वर्ष सलग ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेतील कलाकारांनी देखील लोकांच्या मनात घर केले आहे. अनेक कलाकारांनी ही मालिका सोडली त्या जागी दुसरे कलाकार आले मात्र मालिकेची लोकप्रियता कमी झाली नाही. असे असताना आता ही मालिका सोडून गेलेल्या एका अभिनेत्रीने तिला तिच्या मेहनतीचे पैसे अद्याप मिळेले नसल्याचा आरोप केला आहे.

    नेहा मेहता असे त्या अभिनेत्रीचे नाव असून तिने मालिकेत अंजली भाभीची भूमिका केली होती. नेहाने तब्बल १२ वर्ष ही भूमिका निभावली व तिची भूमिकाही इतर कलाकारांप्रमाणेच प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती. मी तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत तब्बल १२ वर्ष काम केले आहे. २0२0 मध्ये मी ही मालिका सोडली. त्याआधी काही महिन्यांपासूनच माझे पैसे दिले गेले नव्हते. मी मालिका सोडून दोन वर्ष उलटली अद्याप मला माज्या मेहनतीचे पैसे मिळालेले नाहीत. मालिका सोडल्यानंतर मी त्यांना फोन करून माझे पैसेही मागितले. मला सतत तक्रार करायला आवडत नाही. मला अजुनही आशा आहे की लवकरच यावर तोडगा निघेल व मला माझे पैसे मिळतील, असे नेहा मेहताने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code