Header Ads Widget

परिवर्तनाचा पाऊस....

  बनावटीच्या काळोखगर्भी
  विचारावर जेव्हा
  परिवर्तनाचा पाऊस
  ओसंडून कोसळू लागले
  तेव्हा मातीतून
  सम्यक विचार
  अंकुर उमलू लागले..
  यज्ञामध्ये पशुहत्या
  घडू लागली
  तेव्हा माणुसकीचे
  प्रचंड ढग
  गडगडू लागले...
  अपौरुषेयच्या नावावर
  शोषणाचे अड्डे
  तयार झाले
  तेव्हा
  माणुसकीचे महायुद्ध
  सुरू झाले...
  पाऊस मनसोक्त
  बरसणारा हवा.
  पाऊस धरणीला
  फुलवणारा हवा.
  पाऊस सृजनाचा
  सुंदर आविष्कार हवा.
  पण अपरिवर्तनीय पाऊस
  कधीच माणुसकीची
  सौंदर्य पौर्णिमा
  बनत नाही..
  अग्नीविराच्या बनावटीवर
  जेव्हा
  तरुणाई आक्रंदन
  करते तेव्हा
  अपरिवर्तनीय पाऊस
  फिदीफिदी हसतो.
  तरूणाईची महाऊर्जेला
  आव्हान देतो.
  या खदखदणा-या ज्वालेला
  परिवर्तन पाऊस
  मदत करतो.
  म्हणून आज
  लोकशाही विदृप
  करणाऱ्या कौर्यजीवावर
  क्रांतीतेजाचा
  परिवर्तन पाऊस हवा.
  - प्रा.संदीप गायकवाड

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या