Header Ads Widget

मेळघाटात कोविड प्रतिबंधक लसीकरणाला गती मिळण्यासाठी ‘हर घर दस्तक’ - जि. प. सीईओ अविश्यांत पंडा

* खडीमल येथे लसीकरणास मोठा प्रतिसाद
    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : मेळघाटात कोविड प्रतिबंधक लसीकरणाला गती देण्यासाठी ‘हर घर दस्तक’ कार्यक्रमात घरोघर जनजागृती करावी व लसीकरण पूर्ण करून घ्यावे, असे निर्देश जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी चिखलदरा येथील आढावा बैठकीत गुरूवारी दिले.

    धारणी व चिखलदरा विभागातील आरोग्य यंत्रणेचा त्यांनी चिखलदरा येथे घेतला व तत्पूर्वी खडीमल येथेही भेट देऊन आरोग्य उपकेंद्राची पाहणी केली. तालुका आरोग्य अधिका-यांसह अनेक अधिकारी उपस्थित होते.

    खडीमल येथील लसीकरणाला गती देण्याच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांच्या निर्देशानुसार तत्काळ शिबिर घेण्यात आले. त्यामुळे खडीमल येथे एकाच दिवशी ३७० व्यक्तींचे लसीकरण झाले. त्याचप्रमाणे, ताप सर्वेक्षण, डायरिया कंट्रोल कृती, स्पुटम व ताप रुग्णाचे बीएस गोळा करून तपासणीस पाठविण्यात आले.

    या संपूर्ण कामाचा पाठपुरावा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दिलीप रणमले , माता बाल संगोपन अधिकारी डॉ. विनोद करंजेकर तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सतीश प्रधान यांनी केला.लसीकरण पूर्ण करून घ्यावे. त्यामुळे आपण आपल्या शरीरामध्ये कोविड प्रतिबंधक प्रतिकारशक्ती तयार करू शकू व येणाऱ्या कोविडच्या चौथ्या लाटेला प्रतिकार करू शकू. नागरिकांनी आरोग्य कर्मचारी यांना संपूर्ण सहकार्य द्यावे. लसीकरणासाठी आरोग्य विभागाला इतर विभागांनीही मदत करावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पंडा यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या