Header Ads Widget

आशिष...

  आता तरी बरस बाबा
  वांझोटे ढग आणू नको
  चादर फाटेल बळीची
  इतकी मात्र ताणू नको
  नुसताच मांडव केलास
  सरीवर सरी बरसू देत
  आकाशी भिडले डोळे
  झाडं वेली आणि शेत
  दरवळू दे सुगंध आता
  इथल्या निर्मळ मातीचा
  पेटू देत चुल्हा बळीचा
  उजेड दिव्याच्या वातीचा
  वर्षभराची खेप असती
  रिकाम्या हाती नको धाडू
  दुबार पेरणीच संकट
  त्याच मातीत नको गाडू
  शेती मातीचा भरोसा
  निसर्गाच्या देणगीवर
  उभं आयुष्य पेटलेला
  या लहानशा ठिणगीवर
  कोलाहल नच करता
  शांततेतेचाच फेर धर
  कोमेजलेल्या मुखावर
  आशिषाचा वर्षाव कर
पी के पवार सोनाळा बुलढाणा ९४२१४९०७३१

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या