Header Ads Widget

महाडीबीटी प्रणालीवर अर्ज भरण्यास आता 30 जूनपर्यंत मुदतवाढ

    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत सन 2021 -2022 वर्षासाठी महाडीबीटी पोर्टलवर अनुसूचित जाती, व विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गासाठी नवीन अर्ज व नुतनीकरणाचे अर्ज भरण्यासाठी आता दिनांक 30 जून 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. संस्था व महाविद्यालयांच्या प्राचार्यांना सूचित करण्यात येते की, नुतनीकरणाचे अर्ज विहित मुदतीत भरण्यासाठी https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावे.

    नुतनीकरणाचे अर्ज तसेच विद्यार्थ्यांच्या सेंड बँक केलेल्या अर्जांची संबधित महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून त्वरित त्रुटीपूर्तता करुन जिल्हा लॉगिनवर पाठविण्यात यावे. विहित वेळेत अर्ज भरून घेण्याची जबाबदारी संबधित महाविद्यालयांची राहील. महाडीबीटी संकेतस्थळावर जिल्हयातील विद्यार्थ्यांना तसेच महाविद्यालयांना नुतनीकरणाचे अर्ज रिअप्लाय करण्यासाठी आणि सेंड बँक केलेल्या अर्जांची त्रुटी पूर्तता करण्याचे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त श्रीमती माया केदार यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या