- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : 13 जून 2022 रोजी जिल्हातील सर्व प्रादेशीक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांची व्हिडीओ कॉन्फरन्सचे माध्यमातुन बैठक घेवून राज्यातील सर्व अनुःजाती व नवबौध्दा घटकांतील मुला मुलींच्या निवासी शाळामध्ये शाळेच्या पहील्याच दिवशी विद्यार्थी प्रवेशोत्सव साजरा करणेबाबत निर्देश दिले आहे.
अमरावती जिल्हामध्ये अनुजाती व नवबौध्द घटकातील मुलांसाठी 4 व मुलीसाठी 3 अशा एकुण 7 शाळा आज रोजी कार्यरत आहे. त्यापैकी अनुजाती व नवबौध्द घटकातील मुलींची निवासी शाळा हिंगणगाव ता. धामणगांव रेल्वे या शाळेवर मा. जिल्हाधिकारी, अमरावती हया विद्यार्थी प्रवेश उत्सवास दि. 27 जून 2022 रोजी उपस्थित राहणार आहे. तर इतर शाळामध्ये तालुक्याच्या ठिकाणचे संबंधित अधिकारी व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयामधील प्रत्येकी एक अधिकारी किंवा कर्मचारी हे जिल्हातील इतर शाळामध्ये विद्यार्थी प्रवेशोत्सवास दि. 27 जून 2022 रोजी उपस्थित राहणार आहे. व समाज कल्याण विभागाच्या सर्व शाळामध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी म्हणजेच दिनांक 27 जून 2022 रोजी एकाच वेळी जिल्हातील सर्व निवासी शाळामध्ये प्रवेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
- (Images Credit : Pudhari)
0 टिप्पण्या