- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : अनुसूचित जाती तथा नवबौध्द मुलींची शासकीय निवासी शाळा बुरडघाट ता. अचलपुर जि. अमरावती येथे निकालाची परंपरा कायम ठेवून सत्र 2021-22 मध्ये 100 टक्के निकाल लागला आहे.
एकुण 33 विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ठ करण्यात आले होते. पैकी 33 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन 100 टक्के निकाल लागला आहे. शाळेत पहिली येणाचा मान कु. मनिषा प्रेमलाल सोनारे 91.40 टक्के व्दितीय कु. सोनाली राधेश्याम झाडखंडे 90.40 टक्के आणि तृतिय क्रमांक कु. शितल गणेश बेलकर 88.20 टक्के असे असून 33 विद्यार्थ्यांमध्ये 30 विद्यार्थी प्राविण्यप्राप्त 75 टक्के असून 3 विद्यार्थीनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या आहेत.
सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थींचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
0 टिप्पण्या