• Sat. Jun 3rd, 2023

शहरात तारखेडा (आसीर कॉलनी) येथील मनपा दवाखाना रुग्णसेवेसाठी सज्ज

  गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

  अमरावती (प्रतिनिधी) : महानगरपालिका आयुक्‍त डॉ.प्रवीण आष्‍टीकर यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून महानगरपालिकेचा आसीर कॉलनी येथील मनपा दवाखाना आता रुग्ण सेवेत सज्ज झाला आहे. आगामी पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता या रुग्णालयात साथरोग निवारणार्थ प्रभावी उपचार यंत्रणा कार्यान्वित करुन सूतिका गृह सुरु करण्‍यात आले. यावेळी सुयोग्य नियोजन व आरोग्य सेवा सुविधांसंदर्भात महानगरपालिका आयुक्‍त डॉ.प्रवीण आष्‍टीकर यांनी आसीर कॉलनी येथील मनपा दवाखाना येथे व्‍यवस्‍था करण्‍याबाबत निर्देश दिले होते. त्‍या अनुषंगाने सदर दवाखाना सुरु करण्‍यात आला आहे.

  शहरवासीयांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून शहराच्या मध्य भागात असलेले रुग्णालय लांब पडत आहे. त्यामुळे शहरांतर्गत मनपाच्या शहरी आरोग्य केंद्रामध्ये आरोग्य विषयक सुविधा निर्माण करून येथील वैद्यकीय सेवा अधिक वृद्दींगत करण्यावर महानगरपालिका आयुक्‍त डॉ.प्रवीण आष्‍टीकर यांच्या द्वारे सातत्यपूर्ण भर दिला जात आहे. अशातच आसीर कॉलनी मनपा दवाखान्याची परिपूर्ण बांधकाम असलेली इमारत ही बंद अवस्थेत असल्याने निरुपयोगी ठरत होती. या इमारतीत स्थानिक परिसरवासीयांकरिता प्राथमिक रुग्णालय व सूतीकागृह उभारून आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्‍याच्‍या अनुषंगाने महानगरपालिका आयुक्‍त डॉ.प्रवीण आष्‍टीकर यांनी निधी मंजूर करून दिला. सदर निधी प्राप्त होताच तेथील स्थापत्य व विद्युतीकरणाचे काम करण्यात आले. यासह मेडिकल संसाधने, फर्निचर ची सुद्धा दवाखान्यात उपलब्धता करण्यात आली आहे. त्यामुळे आता हा दवाखाना रुग्णसेवेसाठी सुरु करण्‍यात आला.

  मनपाच्या आसीर कॉलनी सूतिकागृह रुग्ण सेवेत सज्ज असून सुरुवातीला या ठिकाणी बाह्य रुग्ण विभाग सुरु करण्यात आला, ज्यामध्ये गरोदर माता तपासणी, बालरोग व जनरल मेडिसिन सुविधांची उपलब्ध करण्यात आली असल्याची माहिती मनपा आरोग्य अधिकारी डॉ.विशाल काळे यांनी दिली. दवाखान्यात नोंदणी विभाग, औषध वितरण कक्ष, इंजेक्शन व रक्त नमुने तपासणी कक्ष, स्टाफ रूम तयार करण्‍यात आले आहे. तसेच सर्व सोयी सुविधांनी आसीर कॉलनी येथील मनपा दवाखाना सज्ज असल्याबाबत समाधान व्यक्त केले. रुग्ण व नातेवाईकांसाठी पिण्याचा पाण्याचा पुरवठा व्हावा म्ह्णून मजीप्राकडून पाईप लाईन टाकण्यात आली आहे, लगतच परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसविण्यात आले आहेत, आरोग्याच्या दृष्टीने साफसफाई महत्वाची असून स्वच्छता विषयक कामांचे नियोजन करण्‍यात आले आहे, परिसरात सौंदर्यीकरण, वृक्ष लागवड करून रुग्णांना बसण्यासाठी बाक लावण्याचे नियोजन करण्‍यात आले आहे.

  आसीर कॉलनी येथील मनपा दवाखाना परिसरातील खुली जागेचा वापर सुद्धा पार्किंग, ऍम्ब्युलन्स उभ्या करण्यासाठी, तसेच परिसरात गार्डन साठी करण्‍यात आला आहे. कोरोना काळानंतर आता अन्य आजार, साथरोग, महिला आरोग्य यावर लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे. आता आरोग्य सुविधांच्या कक्षा विस्तारून रुग्ण सेवा अधिक बळकट करण्याचा आपला प्रयत्न आहे. मनपाचा आसीर कॉलनी दवाखाना सुरु झाले असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालय, डफरीन रुग्णालय व इतर शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रावर पडणारा भार कमी होईल, तसेच महेंद्र कॉलनी, नवसारी, वलगाव रोड मार्गावरील रहिवासी क्षेत्रातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधांचा लाभ मिळणार असून अमरावतीच्या आरोग्य सेवेतही भर पडणार आहे.

  महानगरपालिका आयुक्‍त डॉ.प्रवीण आष्‍टीकर यांनी वैद्यकीय आरोग्‍य अधिकारी डॉ.विशाल काळे व कर्मचारी, उपअभियंता प्रमोद इंगोले व कर्मचारी यांचे विशेष कौतुक केले. या ठिकाणी लसीकरणाची सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍याचे निर्देश आयुक्‍तांनी दिले आहे. या ठिकाणी पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय यांनी विशेषज्ञ डॉक्‍टर वर्ग उपलब्‍ध करुन दिला असून दवाखान्‍यातील कर्मचारी वर्ग हा महानगरपालिकेचा राहणार आहे.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *