• Wed. Jun 7th, 2023

शहरातील नागरिकांच्‍या तक्रारींचे त्‍वरीत निराकरण करावे मा.आमदार प्रविण पोटे पाटील

    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : मा.प्रविण पोटे पाटील आमदार, विधान परिषद सदस्‍य यांचे शहरातील विविध समस्‍या व नागरिकांना होत असलेल्‍या गैरसोय बद्दल तक्रारींच्‍या आधारावर बुधवार दिनांक ८ जून,२०२२ रोजी सकाळी ११.३० वाजता मा.आयुक्‍त यांचे कक्षालगतचे सभागृह, महानगरपालिका, अमरावती येथे बैठक आयोजित करण्‍यात आली होती. या बैठकीत साफ सफाई, हॉकर्स झोन नियोजन, अतिक्रमण विभाग, आरोग्‍य विभाग, प्रकाश विभाग, शिक्षण विभाग, नगर रचना विभाग, परिवहन विभाग, नाले सफाई नियोजन, पाळीव व मोकाट जनावरे नियोजन, प्रधानमंत्री आवास योजना, बांधकाम विभाग या विषयांच्‍या अनुषंगाने बैठक आयोजित करण्‍यात आली होती. यावेळी विविध विषयांवर सविस्‍तर चर्चा करण्‍यात आली.

    या बैठकीत आमदार प्रविण पोटे पाटील यांनी सांगितले की, अमरावती महानगरपालिकेकडे बांधकाम परवानगीचे अनेक प्रकरणे प्रलंबित असून ते त्‍वरीत निकाली काढण्‍याच्‍या सुचना यावेळी आमदार महोदयांनी दिल्‍या. महानगरपालिकेने विजेची बचत करणे गरजेचे असून यासाठी सोलर प्रोजेक्‍ट सुरु करावा त्‍यासाठी सहकार्य निश्चितच केल्‍या जाईल असे आमदार महोदयांनी सांगितले. संडासाचे टाके साफ करण्‍यासाठी नागरिक महानगरपालिकेकडे पावती फाडतात पण त्‍यांचे काम त्‍वरीत होत नाही त्‍यामुळे सदर काम त्‍वरीत होणे गरजेचे असून या संदर्भातील कार्यवाही लवकर करावी. शहरातील स्‍वच्‍छते विषयी अनेक तक्रारी प्राप्‍त होत असून त्‍याचा त्‍वरीत निपटारा करावा. शहरातील विविध भागात खोके वाटप करण्‍यात आले असून ज्‍या कामासाठी ते खोके दिले आहेत त्‍या कामासाठी ते वापरल्‍या गेले पाहिजे. हॉकर्स झोनचे नियोजन त्‍वरीत करुन त्‍याची अंमलबजावणी करावी. बगीच्‍याचे कंत्राट स्‍थ‍ानिक सुक्षिशित बेरोजगारांना देण्‍यात यावे. महानगरपालिकेने स्‍वत:चा टोल फ्री क्रमांक जाहिर करुन नागरिकांना त्‍यांचा तक्रारी नोंदविण्‍यासाठी व्‍यवस्‍था करावी. नागरिकांना सेवा देणे महानगरपालिकेचे कर्तव्‍य आहे.

    शहरातील विविध भागात कचरा टाकण्‍यासाठी नविन कंटेनरची व्‍यवस्‍था करावी तसेच व्‍यावसायिकांना डस्‍टबिन ठेवण्‍यासाठी प्रोत्‍साहित करावे. लसीकरणाचे प्रमाण वाढविण्‍यासाठी प्रयत्‍न करावे. शिक्षण विभागाने पुढाकार घेवून शाळेचे आधुनिकीकरण करावे अश्‍या अनेक सुचना यावेळी आमदार महोदयांनी दिल्‍या. महानगरपालिकेला कोणतेही सहकार्य लागल्‍यास ते सहकार्य करण्‍यासाठी प्राधान्‍याने पुढाकार घेतला जाईल.

    या बैठकीत महानगरपालिका आयुक्‍त डॉ.प्रवीण आष्‍टीकर, उपायुक्‍त सुरेश पाटील, उपायुक्‍त डॉ.सिमा नैताम, मुख्‍यलेखापरिक्षण राम चव्‍हाण, मुख्‍यालेखाधिकारी हेमंत ठाकरे, पर्यावरण संवर्धन अधिकारी महेश देशमुख, सहाय्यक संचालक नगर रचना आशिष उईके, शहर अभियंता रविंद्र पवार, तांत्रिक सल्‍लागार जिवन सदार, सहाय्यक आयुक्‍त नरेंद्र वानखडे, योगेश पिठे, नंदकिशोर तिखिले, तौसिफ काझी, भाग्‍यश्री बोरेकर, वैद्यकीय आरोग्‍य अधिकारी डॉ.विशाल काळे, नगरसचिव मदन तांबेकर, शिक्षणाधिकारी डॉ.अब्‍दुल राजीक, पशुशल्‍य चिकीत्‍सक डॉ.सचिन बोंन्‍द्रे, जनसंपर्क अधिकारी भुषण पुसतकर, बाजार व परवाना अधिक्षक उदय चव्‍हाण, समाज विकास अधिकारी धनंजय शिंदे, माजी उपमहापौर कुसुम साहु, माजी स्‍थायी समिती सभापती राधा कुरील, माजी झोन सभापती संजय वानरे, माजी नगरसेवक राजेश साहु, माजी नगरसेवक आशिष अतकरे, माजी नगरसेवक मिलींद बांबल, प्रमोद राऊत, स्‍वास्‍थ अधिक्षक एकनाथ कुलकर्णी, उपअभियंता श्‍यामकांत टोपरे, प्रमोद इंगोले, श्रीरंग तायडे, अभियंता लक्ष्‍मण पावडे तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *